आजकालच्या कालावधीमध्ये क्रेडिट कार्डचा वापर फार मोठ्या संख्येने वाढला असून क्रेडिट कार्डधारकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रकारची बिले तसेच शॉपिंग किंवा इतर अनेक प्रकारच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना तो अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करणे खूप गरजेचे असते. व्यवस्थित वापर जर आपण केला तर क्रेडिट कार्डचा वापर हा खूप फायद्याचा ठरतो.
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या कालावधीसाठी आपल्याला बिनव्याजी पैसे मिळत असतात व त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करण्यासाठी केला जातो. परंतु जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरत असतो तेव्हा बऱ्याचदा त्या कार्डचा लिमिट पार करतो. परंतु खरंच आर्थिक दृष्टिकोनातून क्रेडिट कार्डचा वापर करताना त्याची लिमिट ओलांडणे फायद्याचे आहे का? हा प्रश्न आपण कधीही स्वतःला विचारत नाही. क्रेडिट कार्डचा वापर करत असताना जर अशा पद्धतीने लिमिट पार केले तर त्याचा वाईट परिणाम हा तुमचा क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो व यासोबत इतर नुकसान देखील होते.
क्रेडिट कार्डचा वापर करा परंतु लिमिटमध्ये
क्रेडिट कार्डच्या वापरामध्ये त्याची मर्यादा म्हणजेच लिमिटचे भान ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यातच ग्राहकाने स्वतःचा खर्च आटोपशीर घेणे गरजेचे असते. तसे पाहायला गेले तर बँकांच्या माध्यमातून हे लिमिट ठरवले जात असते व त्यासाठी वेगवेगळे निकष बँक लावतात. यामध्ये ग्राहकाचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोरचा हिशोब या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बँक क्रेडिट लिमिट घालून देते. परंतु जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करत असताना कायम तो लिमिट पार करत असू तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
अशा पद्धतीने वारंवार जर तुम्ही क्रेडिट कार्डचा लिमिट पूर्ण वापरत असाल तर क्रेडिट युटीलायझेशन रेशोमध्ये वाढ होते. साहजिकच याचा विपरीत परिणाम क्रेडिट स्कोर वर होतो व क्रेडिट स्कोर घसरतो. क्रेडिट स्कोर घसरला म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला कुठलंही कर्ज हव असेल तर अनंत अडचण येऊ शकतात. तसेच क्रेडिट कार्डचा वापर करत असताना एखादी व्यक्ती सतत त्याचा पूर्ण बॅलन्स संपवत असेल तर बँकेच्या माध्यमातून क्रेडिट कार्डची लिमिट देखील कमी करण्याची शक्यता असते व पुढे जाऊन बँक अशा ग्राहकाला डिफॉल्टर म्हणून घोषित करू शकते. यामुळे अशा पद्धतीने जर बँकेने कार्डचे क्रेडिट लिमिट घटवले तर क्रेडिट स्कोर देखील ऑटोमॅटिक घसरतो.
तसेच दीर्घकाळापर्यंत ग्राहकाने अशा पद्धतीने कार्डचा वापर केला तर बँक क्रेडिट कार्ड बंद देखील करू शकतो. तसेच परत परत क्रेडिट कार्डचा संपूर्ण बॅलन्स जर एखादा ग्राहक वापरत असेल तर त्याचा ग्राहकाच्या फायनान्शिअल इमेज वर देखील निगेटिव्ह परिणाम होतो. अशामुळे बँक आणि क्रेडिट स्कोर एजन्सी संबंधित ग्राहक हा उधळा किंवा अव्यवहारी असल्याचा शिक्का देखील मारू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर विचार करून वापरणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना तो त्याच्या लिमिटच्या 30% पर्यंत करणे गरजेचे आहे.