पैसा डबल करायचाय? मग पोस्टाची ‘ही’ स्किम वाचाच; अगदी कमी वेळेत होतील दुप्पट पैसे

Published on -

सध्या प्रत्येकजण आपल्या पैसा सुरक्षित ठेऊन तो वाढवायचा प्रयत्न करत असतो. भविष्यासाठी अनेकजण पैशाची योग्य गुंतवणूक करण्यावर भर देताना दिसतात. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. नागरिकांची हीच गरज ओळखून पोस्ट ऑफिसनेही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम, Time Deposit Scheme यात गुंतवणुक केल्यास रक्कम दुप्पट होणार आहे.

काय आहे डिपाँझिट स्किम

पोस्टाच्या टाइम डिपॉजिट स्कीमला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गंत ग्राहकांचे पैसे दुप्पट होऊ शकतात. बँकेच्या तुलनेत येथे जास्त व्याजदर मिळतो. यात 1 वर्ष, 2वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता. एक वर्षांपर्यंत गुंतवणुक केल्यास 6.9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. तर 2 किंवा 3 वर्षांपर्यंत पैसे गुंतवल्यास 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. हेच पैसे अजून पाच वर्षे ठेवले तर ते दुप्पट होतात.

पैसे दुप्पट कधी होतात?

पैसे दुप्पट करण्यासाठी ते सुरुवातीला पाच वर्षांसाठी गुंतवावे लागतात. समजा, पहिल्या पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यावर 7.5 टक्क्यांनी व्याज मिळेल. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 2,24,975 रुपयांचे व्याज मिळेल. गुंतवणुक केलेली रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी 7,24,974 होईल. टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेले पैसे 9.6 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट मिळेल. म्हणजे 114 महिन्यांच्या गुंतवणुकीनंतर पैसे दुप्पट होतील.

आयकराचा मिळतो फायदा

टाईम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. या बचत योजनेत सिंगल अकाउंट किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News