उद्योग करायचाय? मोदी सरकार देतंय 5 लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसं घ्यायचं कार्ड? वाचा

Published on -

केंद्रातील भाजप अर्थात नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा नवे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना यापूर्वीच सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत दिली जात आहे. याशिवाय मुद्रा लोनसारख्या योजनांचाही लाभ घेता येत आहे. केंद्राने सर्वसाधारण अर्थसंकल्पात क्रेडिट कार्ड सुरु करण्याची घोषणाही केली. याचा काय फायदा होईल? कोण अर्ज करु शकेल? हे आपण पाहूयात…

काय आहे उद्देश?

भारताचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला जाहीर झाला. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुक्ष्म उद्योगांसाठी एक मोठी घोषणा केली. उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सुक्ष्म उद्योगांसाठी पाच लाख रुपयांच्या मर्यादेसह विशेष कस्टमाईज्ड क्रेडिट कार्ड सुरु करण्याचे जाहीर केले. पहिल्यावर्षी 10 लाख कार्ड वितरीत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कशी करता येईल नोंदणी?

यासाठी सर्वप्रथम एंटरप्राईज पोर्टल msme.gov.in येथे भेट द्या. येथे तुम्हाला Quick Link यात जावे लागेल. यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन वर क्लिकर करुन नोंदणी करावी लागेल. येथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे व पात्रतेची सविस्तर माहिती मिळेल. त्यानुसार तुम्ही नोंदणी करु शकता. नोंदणीकृत सुक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड सुविधा आहे.

अजून काय घोषणा झाल्या?

सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी क्रेडिट कव्हर गॅरंटी कव्हर 5 कोटींवरुन 10 कोटी करण्यात आले. यामुळे पाच वर्षांत 1.5 लाख कोटी कर्ज वितरीत करणे शक्य होणार आहे. तसेच प्राधान्य क्रमाने निवडलेल्या 27 क्षेत्रातील उद्योगांसाठी स्टार्टअप गॅरंटी कव्हर 10 कोटींवरुन 20 कोटी करण्यात आले आहे. त्यासाठी फक्त 1 टक्के स्टार्टअप शुल्क लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe