SBI Car Loan : एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. SBI ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ऑफर करत आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना कमी व्याज दरात कार लोन, ऑटो लोन देखील दिले जात आहे.
खरंतर आपल्यापैकी अनेकांचे कार खरेदीचे स्वप्न असेल. मात्र, काही लोकांना पैशाअभावी कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण, ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एसबीआय बँक देखील परवडणाऱ्या व्याजदर ऑटो लोन उपलब्ध करून देत आहे.
ग्राहक कार खरेदी करण्यासाठी काही पैसे डाऊनपेमेंट करून बाकीच्या पैशांसाठी ऑटो लोन घेऊ शकता. दरम्यान आता आपण एसबीआय बँक कार लोन साठी किती व्याज आकारत आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.
तसेच आज आपण एखाद्या व्यक्तीने जर दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर त्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार आणि या कर्जासाठी त्याला किती रुपयांचे व्याज द्यावे लागणार हे समजून घेणार आहोत.
SBI बँकेचे कार लोनसाठीचे व्याजदर
SBI सध्या वार्षिक 8.85 टक्के या प्रारंभिक व्याज दराने कार लोन ऑफर आहे. येथे लक्षात ठेवा की हा दर 750 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्या अर्जदारांसाठीच लागू राहणार आहे. जर स्कोर कमी असेल तर यापेक्षा अधिकचे व्याज देखील बँकेकडून वसूल केले जाऊ शकते.
दरम्यान आता आपण जर एखाद्या व्यक्तीने एसबीआय बँकेकडून दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो याविषयी थोडक्यात समजून घेणार आहोत.
दहा लाखाच्या लोनसाठी कितीचा हप्ता भरावा लागणार?
जर एखाद्या व्यक्तीला एसबीआयकडून दहा लाख रुपयांचे कार लोन 8.85% या व्याजदराने आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी मिळाले तर त्याला 20686 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीला कार लोनसाठी पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 2,41,138 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी सदर कर्जदार व्यक्तीला 12 लाख 41 हजार 138 रुपये भरावे लागणार आहेत.