वारी एनर्जीच्या शेअर्सना धक्का! अमेरिकेच्या ‘या’ निर्णयाने बाजार हादरला… गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

Published on -

Waaree Energies Share Price:- आज शेअर बाजारात वाऱ्याची दिशा थोडी बदललेली दिसली. वारी एनर्जीजच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली. बाजारात सकाळपासूनच या शेअरची विक्री सुरू होती आणि दुपारी पर्यंत त्याची किंमत सुमारे २,६९० रुपयांवर पोहोचली, म्हणजेच सुमारे ३ टक्क्यांची घसरण. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या पाचपैकी चार ट्रेडिंग सत्रांत वारीचा शेअर घसरलेलाच दिसतोय, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडी चिंता निर्माण झाली आहे.

या घसरणीमागील मुख्य कारण

या घसरणीचं मुख्य कारण अमेरिकेतून आलेली एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे. तिकडे अमेरिकन सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने एक नवीन कायद्याचा प्रस्ताव मांडलाय, ज्यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना मिळणाऱ्या कर सवलती थांबवण्याचा विचार आहे. हा बदल २०२८ पासून लागू होऊ शकतो, पण त्याची चर्चा सध्या सुरू झाल्यामुळेच बाजारात अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः वारीसारख्या कंपन्या ज्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सौर प्रकल्पांशी जोडलेला आहे, त्यांच्यावर याचा तात्काळ परिणाम होतोय.

अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनीही या पार्श्वभूमीवर एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सौर आणि पवन ऊर्जा स्रोतांवर टीका केली आहे. त्यांनी या प्रकारच्या वीज निर्मिती पद्धतींना “परजीवी” असं संबोधलंय, कारण त्या नेहमी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असतात. या विधानानेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे.

वारी एनर्जीजसाठी ही बातमी त्यामुळे अधिक चिंतेची ठरतेय, कारण कंपनीच्या एकूण ऑर्डर बुकपैकी सुमारे ५७ टक्के प्रकल्प हे निर्यातीवर, विशेषतः अमेरिकेवर आधारित आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीकडे ४७,००० कोटी रुपयांची ऑर्डर बुक होती. मात्र, ब्रोकरेज फर्म जेफरीजने इशारा दिला आहे की अमेरिकेतून येणाऱ्या नवीन ऑर्डर्समध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे कंपनीचा आगामी महसूल थेट धोक्यात येऊ शकतो.

दुपारच्या सुमारास NSE वर वारी एनर्जीजचा शेअर २,७१२ रुपयांवर ट्रेड होत होता, जो अजूनही सुमारे २.७२ टक्क्यांनी खाली होता. गेल्या महिनाभरात या शेअरमध्ये एकूण ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे आणि सध्या तरी बाजार त्याच्याकडे सावधगिरीनेच पाहतो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!