Gold Rate Prediction:- गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून सोने चांदीची खरेदी आता सर्वसामान्य ग्राहकांच्या आर्थिक आवाक्या बाहेर गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांनी एक लाखाचा टप्पा पार केला आहे व यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. सोन्या चांदीचे दर वाढण्यामागे अनेक महत्त्वाचे अशी कारणे आहेत व यामध्ये अनेक कारणे ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. सध्या जर आपण बघितले तर सोन तेजीच्या टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर सध्या तीन हजार पाचशे डॉलर प्रति औंस वरून तब्बल 4750 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात सोन्याचे दर हे एक लाख 40 हजार ते एक लाख 45 हजार प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचू शकतात. चला तर मग अशा पद्धतीचे दरवाढ कोणत्या कारणांमुळे होऊ शकते याची माहिती आपण बघू.
सोन्याची दरवाढ होण्यामागील कारणे
1- सेंट्रल बँकांची खरेदी- सध्या जर आपण सोन्याची मागणी बघितली तर ती सगळ्यात जास्त सेंट्रल बँकांच्या माध्यमातून असल्याचे दिसून येत आहे. या मागणी मागील प्रमुख कारण म्हणजे डॉलर वरील अवलंबन कमी करणे आणि सध्या जागतिक पातळीवर काही देशांमध्ये सुरू असलेल्या भू राजकीय तणावामुळे अनेक देश हे राखीव निधीची प्लॅनिंग बदलत आहेत व त्यामुळे सेंट्रल बँकांकडून सोन्याची मागणी वाढलेली आहे. जर आकडेवारी बघितली तर 2025 च्या पहिल्या तिमाहित सेंट्रल बँकांची सोन्याची खरेदी ही गेल्या पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा तब्बल 24 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले.

2- रुपयाचे अवमूल्यन- आपल्याला माहित आहे की एप्रिल 2025 मध्ये जागतिक बाजारामध्ये सोन्याचे दर 3500 डॉलर प्रति औंसवर पोचले तेव्हा भारतामध्ये एक तोळ्याचा सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या पुढे गेला होता. यामागील प्रमुख कारण हे रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण असल्याचे दिसून आले. यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदार देखील सोन्याच्या खरेदीकडे वळले व मागणी वाढून सोन्याचे दर वाढले. तसेच जून 2025 मध्ये गोल्ड ईटीएफ मध्ये देखील दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पाहायला मिळाली व या गुंतवणुकीचा ओघ असाच सुरू राहिल्याचे दिसून येत आहे. अगोदर लग्न समारंभ किंवा सणासुदीच्या कालावधी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत होती. परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील आता सोन्याची खरेदी वाढल्याचे दिसून येत असल्याने देखील दरवाढ झालेली आहे.
गुंतवणूक तज्ञांचे मत काय?
सोन्यातील दरवाढीच्या बाबतीत तज्ञांचे मत आहे की सोन्यातील तेजी काही कालावधीपर्यंत टिकू शकते. परंतु सोन्यात गुंतवणूक करताना विचार करूनच करणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. एकाच वेळी मोठी रक्कम सोन्यात गुंतवण्यापेक्षा हप्त्यांमध्ये सोन्याची खरेदी करावी. तसेच तुमचा एकूण पोर्टफोलिओ जो असेल त्यापैकी फक्त पाच ते दहा टक्के रक्कम ही सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरले असे तज्ञांचे मत आहे.