G-Sec : गव्हर्नमेंट बाँड म्हणजे काय ? रिस्क फ्री रिटर्न मिळण्यासाठी एफडीपेक्षा चांगला पर्याय? जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
G-Sec

G-Sec : सध्या तरुणांचा ओढा म्युच्युअल फंड इक्विटी किममध्ये गुंतवणूक करणाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. असे असले तरी आता लोक डेट स्कीमकडे आकर्षित होत आहेत. असे बरेच गुंतवणूकदार आहेत जे जुन्या विकॅहरांचे असून त्यांना जास्त रिस्क घ्यायची नसते.

असे गुंतवणूकदार इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात कारण त्या बाजारात जास्त जोखीम असते. असे गुंतवणूकदार आता पारंपरिक फिक्स्ड इनकम स्कीम्सव्यतिरिक्त डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही वर्षांचा रिटर्नचा चार्ट पाहिला तर एफडी किंवा एनएससीसारख्या स्मॉल सेविंग स्कीम पेक्षा अनेक डेट स्कीमचा रिटर्न जास्त असतो.

जर तुम्ही देखील असा पर्याय शोधत असाल तर पैसे सुरक्षित असतील आणि परतावा चांगला मिळेल असा गवर्नमेंट सिक्योरिटीज (G-Sec) हा पर्याय तुम्हाला निवडता येईल. जाणून घेऊयात त्याबद्दल

काय आहे गवर्नमेंट बॉन्ड?

गवर्नमेंट सिक्योरिटीजला गवर्नमेंट बॉन्ड म्हणूनही ओळखले जातात. सरकारी सिक्युरिटीज म्हणजेच जी-सेक ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून जारी केली जाणारी गुंतवणूक प्रोडक्ट आहेत. सर्वसामान्यांकडून भांडवल उभे करण्यासाठी सरकार हे सिक्युरिटीज जारी करते.

हे बॉण्ड सरकारला गरजेनुसार फंड पुरवतात. शॉर्ट टर्म सिक्युरिटीजला ट्रेझरी बिल म्हणतात जे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जारी केले जातात. गवर्नमेंट बॉण्ड हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जारी केले जातात. केंद्र सरकार ट्रेझरी बिल आणि डेट सिक्योरिटीज दोन्ही जारी करते. राज्य सरकार केवळ डेट सिक्योरिटीज जारी करू शकतात

तुम्हाला किती व्याज मिळतं?

गवर्नमेंट बॉन्ड काँट्रॅक्टमधे निश्चित केलेल्या कूपन दराच्या आधारे व्याज दिले जाते. गवर्नमेंट बॉन्ड केंद्र किंवा राज्य सरकारकडून जारी केले जातात, त्यामुळे जोखीम फारच कमी असते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे बॉन्ड मॅच्युअर झाल्यावर गुंतवणूकदाराला गुंतवलेली रक्कम परत मिळते. सोबतच व्याजाचा लाभ देखील मिळतो. आता सहकारी बँका आणि छोट्या गुंतवणूकदारांना देखील सरकार जी-सेक ऑफर करते.

10 वर्षातील बेस्ट रिटर्न देणाऱ्या स्कीम

Kotak गिल्ट Inv PF & ट्रस्ट: 8.92%

निप्पॉन इंडिया गिल्ट सिक्योरिटीज फंड: 8.90

Kotak Gilt Inv: 8.89%

SBI Magnum Gilt: 8.81%

Bandhan GSF इन्वेस्टमेंट: 8.66%

ICICI प्रू गिल्ट: 8.61%

ABSL गवर्नमेंट सिक्योरिटीज: 8.50%

DSP गवर्नमेंट सिक्योरिटीज: 8.49%

UTI Gilt: 8.45%

HSBC Gilt: 8.00%

गुंतवणूक कशी आणि कोण करू शकते ?

गवर्नमेंट बॉन्ड थेट मार्केटमधून खरेदी करता येतात. गिल्ट म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा डेट फंड आहे जो गवर्नमेंट सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे गिल्ट म्युच्युअल फंड हा गवर्नमेंट बॉण्डमध्ये गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. म्युच्युअल फंड, पीएफ, विमा कंपन्या, कमर्शियल बँका, प्राइमरी डीलर, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि पेन्शन फंड यांच्या माध्यमातून गव्हर्नमेंट बॉण्ड खरेदी-विक्री केली जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe