Home Loan : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील होम लोन घेऊन घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करणे वाईट नसल्याचे सांगतात.
दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायच असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय भेटणार आहे. खरंतर आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये रेपो दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केले होते.

शिवाय या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील रेपो रेट मध्ये पुन्हा एकदा 0.25% कपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून एसबीआय, बँक ऑफ बडोदा तसेच देशातील इतर बँकांनी होम लोनच्या व्याजदरात कपात केलेली आहे. यामुळे सध्याचा काळ हा होम लोनसाठी अनुकूल बनला आहे. दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदाकडून जर चाळीस लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर मासिक पगार किती असायला हवा याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक ऑफ बडोदाचे होम लोनवरील व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक. बँक ऑफ बडोदाने गेल्या काही महिन्यांच्या काळात होम लोनच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. सध्या बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना किमान 8% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतोय. 750 ते 800 च्या दरम्यान ज्या लोकांचा सिबिल स्कोर असतो त्या लोकांना बँकेकडून या किमान व्याजदरात होम लोन मंजूर होते.
40 लाखांच्या होम लोनसाठी पगार किती हवा ?
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ बडोदा कडून जर तुम्हाला चाळीस लाख रुपयांचे होम लोन हवे असेल तर यासाठी तुमचा मासिक पगार 59 हजार रुपये एवढा असणे आवश्यक आहे. हे कॅल्क्युलेशन कर्ज परतफेडीचा कालावधी 30 वर्ष गृहीत धरून आणि व्याजदर आठ टक्के गृहीत धरून करण्यात आले आहे. 59 हजार रुपये महिना पगार असणाऱ्या पगारदारांना बँक ऑफ बडोदा कडून 40 लाख रुपयांचे होम लोन मिळू शकते मात्र यासाठी संबंधित व्यक्तीवर आधीच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे.