Bank FD Timing : अलीकडे बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सुरक्षित गुंतवणूक करणारे लोक पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. किंवा मग बँकेत एफडी करतात. दरम्यान बँकेत एफडी करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एफडी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यामुळे आज आपण याबाबत तज्ञ लोकांनी काय माहिती दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर भारतात मे 2022 नंतरचा काळ मुदत ठेवींमध्ये अर्थातच एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरला आहे. या काळात एफडीच्या व्याजदरात चांगली वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकला आहे.
बँकांमध्ये FD चे व्याजदर जास्तीत जास्त 7 टक्के ते 8 टक्क्यांच्या दरम्यान असतात. गेल्या वर्षापासून मात्र देशातील काही बँकांनी एफडीचे व्याजदर चांगलेच वाढवले आहेत. अलीकडे काही लघु वित्त बँकांमध्ये FD साठी 9.5 टक्के एवढा विक्रमी व्याजदर दिला जात आहे. काही बँकांमध्ये तर यापेक्षाही अधिक व्याजदर मिळत आहे.
नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. पण, येत्या 2024 मध्ये यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. तथापि काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दर कपात सुरू होण्यासाठी अजून काही वेळ शिल्लक आहे. पण एफडीच्या व्याज दरात कपात होणारच हे जवळपास सर्वच तज्ञांचे म्हणणे आहे.
पण सर्व कालावधीच्या FD वर याचा समान परिणाम होणार नाही. मात्र रेपो रेटमध्ये आरबीआयच्या माध्यमातून कपात केली जाऊ शकते असा अंदाज आहे. यामुळे आता एफडी केव्हा केली पाहिजे हाच सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित होत आहे.
एफडी करण्याची योग्य वेळ कोणती आहे?
जर आरबीआयने रेपो दर कमी करण्यास सुरुवात केली तर बँका एफडीचे दर देखील कमी करतील असा अंदाज आहे. त्यामुळे, सध्याचा कालावधी उच्च दराने एफडी बुक करण्यासाठी सर्वोत्तम काळ असू शकतो. तथापि, रेपो दरात कपात सुरू झाली तरीही, एफडी दरांमध्ये लक्षणीय कपात होण्यासाठी काही महिने लागतील. तज्ञांचे म्हणणे आहे की FD बुक करण्याचा सर्वोत्तम काळ आतापासून पुढील 6 महिने आहे, कारण तुम्हाला तुमच्या पैशांवर जास्त परतावा मिळू शकतो.