लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती

Published on -

लग्न म्हटलं की, मोठा खर्च असतो. लग्न पहावे करुन व घर पहावे बांधून, असं म्हणतात. ते यासाठीच की, लग्नाला प्रचंड खर्च येतो. लग्न करताना सगळ्यात मोठी अडचण असते ती, खर्चाची. सामान्यांना लग्न करताना मनात धस्स होतं. अनेक बँकिंग आणि बिगर-बँकिंग संस्था विवाहासाठी कर्ज देतात. परंतु आपण ज्याच्याकडून कर्ज घेतोय त्या कर्जाचा व्याजदर, ईएमआय आणि कालावधी हे सगळं समजणं महत्त्वाचं असतं. लग्नासाठी कर्ज कोण देतं? त्याला काय कागदपत्रे लागतात? तेच आपण या बातमीत पाहू…

मॅरेज लोन म्हणजे काय?

विवाह कर्ज म्हणजेच मॅरेज लोन हे वैयक्तिक कर्जाच्या श्रेणीत येते. काही बँकिंग आणि बिगर-बँकिंग संस्था देखील स्वतंत्रपणे विवाह कर्ज देतात. यामध्ये केवळ वैयक्तिक कर्जाचा व्याजदर आकारला जातो. जर तुम्ही आवश्यक अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला 5 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचे लग्न कर्ज मिळू शकते. लग्न कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा जमा करण्याची आवश्यकता नसते.

कोण कर्ज देतं?

वेगवेगळ्या बँका आणि बिगर-वित्तीय संस्थांनी विवाह कर्ज देतात. मात्र त्यासाठी काही अटी असतात. कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असणे आवश्यक आहे.
त्याचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदार खाजगी किंवा सरकारी कंपनीत काम करत असावा. एकाच कंपनीत कमीत कमी १ वर्ष काम केलेले असावे.
त्याचे किमान उत्पन्न १५ हजार रुपये असावे. त्याला दरमहा पगार स्लिप आणि बँक स्टेटमेंट मिळायला हवे. अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक असावा. त्यानंतर आधार, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. अशा त्या अटी असतात.

कोणत्या बँका कर्ज देतात?

देशातील जवळपास सर्वच आघाडीच्या बँका विवाहकर्ज देतात. मात्र प्रत्येकाच्या व्याजदरात फरक आहे. आयसीआयसीआय बँक लग्नासाठी ५०,००० ते ५० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. त्याचा व्याजदर वार्षिक १०.८५% पासून सुरू होतो. कोटक महिंद्रा बँक ५०,००० ते ३५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. एचडीएफसी बँक किमान ५० हजार रुपये आणि जास्तीत जास्त ४० लाख रुपये कर्ज देते. अ‍ॅक्सिस बँक लग्नासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. बँक ऑफ बडोदा लग्नासाठी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

कर सवलत मिळते का?

विवाह कर्ज वैयक्तिक कर्जाच्या श्रेणीत येत असल्याने त्यासाठी व्याजमाफीची वेगळी तरतूद नाही. विवाह कर्जाचा कालावधी ७ वर्षांचा आहे. तर वैयक्तिक कर्जाचा कालावधी साधारणपणे ५ वर्षांचा असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News