१ फेब्रुवारीला बँका बंद राहणार का? आरबीआयच्या सुट्टीच्या यादीत काय आहे ते जाणून घ्या!

Published on -

आगामी १ फेब्रुवारी २०२५ रोजीचा अर्थसंकल्प देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असून, तो २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी असेल. या दिवशी बँका बंद राहणार का? असा प्रश्न अनेक बँक ग्राहकांच्या मनात आहे.

बँका १ फेब्रुवारीला सुरू राहतील का?

शनिवारी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी बँकांचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सर्व शाखा उघड्या राहतील. कारण हा पहिला शनिवार असल्याने बँका सुरू राहतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी कोणताही अडथळा येणार नाही.

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रत्येक महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करते. यात राष्ट्रीय सुट्ट्या, धार्मिक आणि स्थानिक उत्सव तसेच आठवड्याच्या सुट्ट्यांचा समावेश असतो. फेब्रुवारी २०२५ मध्ये १४ दिवस बँका विविध राज्यांमध्ये बंद राहतील.

महत्त्वाच्या बँक सुट्ट्या – फेब्रुवारी २०२५

  • ३ फेब्रुवारी (सोमवार) – आगरतळा (सरस्वती पूजा)
  • ११ फेब्रुवारी (मंगळवार) – चेन्नई (थायपुसम उत्सव)
  • १२ फेब्रुवारी (बुधवार) – शिमला (संत रविदास जयंती)
  • १५ फेब्रुवारी (शनिवार) – इंफाळ (लोई-न्गाई-नी उत्सव)
  • १९ फेब्रुवारी (बुधवार) – बेलापूर, मुंबई, नागपूर (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
  • २० फेब्रुवारी (गुरुवार) – आयझॉल, इटानगर (राज्य स्थापना दिन)
  • २६ फेब्रुवारी (बुधवार) – देशभरातील निवडक शहरांमध्ये (महाशिवरात्री)

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या

  • २ फेब्रुवारी (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • ८ आणि ९ फेब्रुवारी (शनिवार-रविवार) – दुसरा शनिवार आणि साप्ताहिक सुट्टी
  • १६ फेब्रुवारी (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • २२ आणि २३ फेब्रुवारी (शनिवार-रविवार) – चौथा शनिवार आणि साप्ताहिक सुट्टी

ग्राहक काय करू शकतात ?

बँक शाखा बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि UPI सेवा सुरू राहतील. त्यामुळे एटीएमद्वारे पैसे काढणे, डिजिटल व्यवहार आणि मोबाइलद्वारे बँकिंग सेवा वापरणे सहज शक्य होणार आहे.

१ फेब्रुवारी २०२५ रोजी बँका बंद राहणार नाहीत, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, फेब्रुवारी महिन्यात १४ दिवस विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी त्यांच्या बँकिंग व्यवहारांची योग्य पूर्वतयारी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News