Banking News : सध्या सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी केली जात आहे. नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. येणारे नवीन वर्ष सुखसमाधानाचे आणि भरभराटीचे जावो यामुळे सर्वजण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान जर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात एक जानेवारी 2024 ला बँकेत काही काम असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. खरे तर अनेकांच्या माध्यमातून एक जानेवारीला देशातील बँका बंद राहणार का हा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे याबाबत आरबीआयने काय म्हटले आहे, याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर आरबीआयने जानेवारी महिन्यात किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणाऱ याबाबत एक सर्क्युलर जारी केले आहे. या सर्क्युलरनुसार जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, काही सण राज्यानुसार साजरे केले जातात यामुळे सर्वच राज्यांमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी येणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
दरम्यान एक जानेवारीचा विचार केला असता 1 जानेवारीला आरबीआयने बँक हॉलिडे जाहीर केला आहे. म्हणजेच एक जानेवारी 2024 ला देशातील काही राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत. यामुळे जर तुम्हाला उद्या बँकेत काही काम असेल तर हे काम तुम्हाला मंगळवारीच करावे लागणार आहे.
जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार असल्याने सर्वप्रथम तुम्हाला आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेच्या कामासाठी बाहेर पडावे लागणार आहे. मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करू शकता. यासाठी ऑनलाईन पेमेंट एप्लीकेशनचा वापर करू शकता. यूपीआय पेमेंट एप्लीकेशन जसे की फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या अप्लिकेशनचा वापर करून पैशांचे व्यवहार केले जाऊ शकतात.