Wipro Share Price: ‘हा’ शेअर करू शकतो तुम्हाला श्रीमंत? आजची किंमत पाहून घ्या अंदाज….

Published on -

Wipro Share Price:- आज दुपारच्या सत्रानंतर शेअर मार्केटमध्ये परत पडझड झाल्याचे दिसून येत असून सेन्सेक्स 83.23 अंकांनी घसरून सध्या 80516.08 वर व्यवहार करत आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 11.40 अंकांची घसरण झाली आहे व सध्या निफ्टी 24573.65 वर ट्रेड करत आहे. तसेच महत्त्वाचे असलेल्या निफ्टी बँक या निर्देशांकामध्ये देखील तब्बल 273.80 अंकांची घसरण होऊन 55279.30 वर व्यवहार करत आहे. परंतु या अस्थिर असलेल्या वातावरणामध्ये मात्र विप्रोचा शेअर समाधानकारक कामगिरी करताना दिसून येत असून सध्या 0.87 अंकांच्या वाढीसह 242.49 रुपयांवर ट्रेड करत आहे.

विप्रोच्या शेअरची काय आहे सध्यस्थिती?

आज मंगळवारी विप्रो या कंपनीच्या शेअरची कामगिरी तशी समाधानकारक दिसून येत असून आजच्या मार्केटच्या सुरुवातीपासूनच या कंपनीच्या शेअर्समध्ये काहीशी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. सकाळी जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हा या शेअरची किंमत 243 रुपये होती. परंतु सध्या मात्र त्यामध्ये काहीशी घसरण पाहायला मिळत असून सध्या हा शेअर 242.49 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, विप्रोच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 325 रुपये इतकी राहिली आहे तर नीचांकी पातळी 228 रुपये इतकी राहिलेली आहे.

गुंतवणूकदारांना दिलेला परतावा किती?

विप्रो या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर एक वर्ष कालावधीच्या गुंतवणुकीवर -1.13%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर -22.41%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर +0.36% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -5.97% इतका परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe