Jandhan Yojana:- पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधान जनधन योजनेला सुरुवात केली व सध्या या योजनेला अकरा वर्ष पूर्ण होत आले आहेत. या योजनेमधून नागरिकांचे मोफत बँक खाते उघडण्यात आले व खऱ्या अर्थाने बँकिंग व्यवस्थेशी सर्वसामान्य नागरिकांचा संबंध आला. आज जर आपण भारतात बघितले तर कमीत कमी जनधन खात्यांची संख्या साधारणपणे 13 ऑगस्ट 2025 पर्यंत 56.16 कोटी इतकी झाली. जी मार्च 2015 मध्ये 14.72 कोटी होती. या एकूण खातेधारकांमध्ये महिला खातेदारांचे प्रमाण 56% इतके आहे. तसेच या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे यश जर म्हटले तर ग्रामीण आणि निम शहरी भागांमधील नागरिकांची या योजनेत असलेल्या खात्यांची संख्या तब्बल 67% आहे.ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून खातेधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा देखील दिल्या जातात. त्यापैकी काही महत्त्वाच्या सुविधांची थोडक्यात माहिती या लेखात आपण बघू.
जनधन खात्यावर मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा
पंतप्रधान जन धन योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत 11 वर्षात 56 कोटींच्या वर बँक खाते उघडले गेलेत व कमीत कमी 2.68 लाख कोटी रुपये खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून खातेधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात व त्यातील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्टची सुविधा होय. या सुविधेमध्ये सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना दहा हजार रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच खात्यात एक रुपया नसताना देखील या खातेधारकांना दहा हजार रुपये पर्यंत रक्कम काढता येणार आहे.

इतकेचं नाही तर दोन लाख रुपयांचा विमा आणि एक डेबिट कार्ड देखील खातेधारकांना या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेले खाते हे नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत खातेधारकांना 338.68 कोटी डेबिट कार्ड जारी करण्यात आलेले आहेत. या डेबिट कार्डच्या माध्यमातून रोकड विरहित व्यवहारांची सोय तर होतेच. परंतु या माध्यमातून अपघात विम्याचे संरक्षण देखील मिळते. तसेच या खात्यावर डीबीटी, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँक योजनेचा लाभ देखील मिळतो.