Bank Loan : महिलांना मिळत आहे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत करा अर्ज !

Ahmednagarlive24 office
Published:
Bank Loan

Bank Loan : मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी देखील अशाच काही योजना राबवल्या जात आहेत, ज्या त्यांना पुढे जाण्यास मदत करत आहेत. अशातच मोदी सरकार महिला व्यावसायिकांची संख्या वाढवण्यासाठी एक विशेष योजना राबवत आहे, त्या अंतर्गत महिलांना 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे.

मोदी सरकारने महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजना 2016 मध्ये सुरू केली होती. केंद्र सरकार स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत महिला उद्योजकांसाठी एक कोटी रुपयांचे कर्ज देत आहे.

केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया मार्फत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/किंवा महिला उद्योजकांना कर्ज दिले जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज 7 वर्षांच्या परतफेडीच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध आहे, त्याचा अधिस्थगन कालावधी 18 महिन्यांचा असू शकतो.

मोदी सरकारने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांच्या तारणमुक्त कर्जाची मुदत हातात 2025 पर्यंत वाढवली आहे. जर कोणत्याही महिलेला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.

कसा अर्ज करू शकता?

स्टँड-अप इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.standupmitra.in/Login/Register वर जाऊन तुम्ही तुमची माहिती सबमिट करू शकतात, प्रत्येक कर्जाप्रमाणे, तुमच्याकडे ओळखपत्र, पत्ता पुरावा यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही standupmitra.in वरून यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe