PF च्या पैशातूनही होता येते झटपट श्रीमंत; पैसे वाढविण्याचा ‘हा’ सिक्रेट फाँर्म्यूला माहित आहे का?

Published on -

नोकरी सरकारी असो नाहीतर प्रायव्हेट, EPFO नियमांनुसार तुमची 12% रक्कम दरमहा पीएफ खात्यात जमा होते. तुमची कंपनीही तेवढेच पैसे देते. सध्या दरमहा जमा होणाऱ्या या योगदानावर 8.25% व्याज दिले जात आहे. याच पीएफच्या पैशातून तुम्ही श्रीमंतही होऊ शकता, असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना… पण हे खरं आहे. पीएफ खात्यात जमा होणारा हप्ता वाढवून आपण मोठा निधी उभा करू शकतो.

काय करावं लागेल?

आपल्याला ईपीएफमध्ये पैशांचा हप्ता वाढवता येत नाही. परंतु आपल्या स्वेच्छा निर्वाह निधीमध्ये म्हणजेच व्हीपीएफमध्ये आपला हप्ता वाढवता येतो. व्हीपीएफवरही ईपीएपएवढेच व्याज मिळते. म्हणजेच व्हीपीएफवर सध्या 8.25 टक्के व्याज मिळते. या व्याजातून तुम्हाला मोठा निधी मिळवता येतो.

100% देण्याची सुविधा

VPF मध्ये पगार कपातीची कोणतीही मर्यादा नसते. म्हणजेत तुम्ही तुमच्या भविष्य निर्वाह निधीत कितीही पैसे टाकू शकता. अगदी मूळ पगाराच्या 100 टक्केपर्यंत VPF द्वारे रक्कम जमा करता येते. म्हणजेच तुम्ही VPF द्वारे तुमची गुंतवणूक वाढवली तर तुम्ही 12% पेक्षा जास्त पीएफमध्ये योगदान देऊ शकता.

कशी करायची गुंतवणूक

आता ही गुंतवणूक कशी वाढवायची, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआर विभागाची मदत घेऊ शकता. तुमच्या व्हीपीएफमध्ये गुंतवणूक वाढवायची असेल तर, एचआरच्या मदतीने तुम्ही ईपीएफसोबत तुमचे VPF खाते उघडू शकता. किती वाढ करायची आहे याबद्दल एक फॉर्म भरुन तो एचआरकडे द्यावा लागेल. त्यानंतर VPF खाते ईपीएफ खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन हा हप्ता वाढवता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe