सध्या पावसाने अवकाळी स्वरुपात हजेरी लावली असली तरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अजूनही 40 अंशाच्या पुढे तापमान आहे. अशा वेळी तुम्ही हंगामी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची कल्पना देणार आहोत, जी सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसायात तुम्हाला बर्फाचे तुकडे अर्थात आईस क्युब बनवून विकावे लागतात. यासाठी तुम्हाला दुकानात किंवा गोदामात बर्फाचा क्यूब कारखाना उभारावा लागेल.
काय आहे व्यवसाय?
कडक उन्हाळ्यात, पेये, आईस्क्रीम इत्यादी थंड ठेवण्यासाठी बर्फाच्या तुकड्यांना मोठी मागणी असते. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्नाच्या पार्टींमध्ये लोक मोठ्या प्रमाणात बर्फाचे तुकडे खरेदी करतात. अशा परिस्थितीत तुम्ही बर्फाचे तुकडे बनवण्याचा हा व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे बर्फाचा हा उद्योग फक्त उन्हाळ्यापुरताच मर्यादीत आहे असे नाही. तो बाराही महिने सुरु असतो. फक्त उन्हाळ्यात त्याची मागणी वाढलेली असते.

कशी करायची नोंदणी?
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊन या बर्फाच्या क्यूब बनवण्याच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा आवश्यक असेल. यानंतर तुम्हाला फ्रीजर, बर्फ बनवण्याचे यंत्र, पाणी फिल्टर करण्यासाठी आरओ सिस्टम, पॅकिंग मशीन आणि पिशव्या, जनरेटर, काही कामगार, डिलिव्हरी व्हॅन किंवा बाईक इत्यादी गोष्टींची आवश्यकता असेल.
कसा कराल व्यवयाय?
तुम्हाला तुमच्या शहरातील बर्फाच्या तुकड्यांची मागणी आणि स्पर्धा समजून घ्यावी लागेल. तुमच्या आसपासच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, ज्यूस सेंटर्सची यादी बनवा. यानंतर तुम्हाला उत्पादन सुरू करावे लागेल. तुम्हाला बर्फ स्वच्छ आणि पारदर्शक दिसण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा वापर करावा लागेल. तुम्ही तुमची उत्पादने कोणत्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, ज्यूस सेंटर्स आणि लग्नाच्या हॉलमध्ये विकू शकता याची यादी बनवा आणि त्यांच्याशी संपर्क साधा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनाचा नमुना द्यावा लागेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करावी लागेल. यामुळे, तुम्हाला हळूहळू ग्राहक मिळू लागतील आणि तुमचा व्यवसाय सुरू होईल. जर तुम्ही हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू केला तर त्याची किंमत सुमारे १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.जर तुमचा हा व्यवसाय यशस्वी झाला तर तुम्ही त्याद्वारे चांगली रक्कम कमवू शकाल.