Business Loan: तुम्ही देखील ‘हे’ व्यवसाय करत असणार तर तुम्हाला सरकार देईल 5 टक्के व्याजावर 3 लाखांचे कर्ज! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
business loan

Business Loan:- व्यवसाय उभारण्यासाठी पैसा अगोदर लागतो व हा पैसा नसल्यामुळेच अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. तसेच जे व्यवसाय उभारले गेले आहेत त्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी देखील पैशांची आवश्यकता असते व पैसे  नसल्यामुळे व्यवसाय वाढवता येण्यामध्ये देखील अनेक समस्या उद्भवतात.

त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही योजना राबविण्यात येत आहेत व या योजनेच्या माध्यमातून व्यक्तींना व्यवसाय उभा करण्यासाठी अनुदान स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपामध्ये आर्थिक मदत करण्यात येते व या माध्यमातून मिळालेली मदत ही नागरिकांसाठी खूप महत्त्वाची ठरते.अशा सरकारच्या अनेक योजना आहेत.

परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सरकारच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली होती व या योजनेमध्ये आतापर्यंत 13 लाखांपेक्षा अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. त्यामुळे या लेखात आपण ही योजना नेमकी काय आहे व या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 पीएम विश्वकर्मा योजनेत आहे 18 प्रकारच्या व्यवसायांचा समावेश

पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये हाताने आणि उपकरणांच्या म्हणजेच अवजारांच्या मदतीने काम करणारे कारागीर व त्यासह 18 व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण यामध्ये पाहिले तर हातोडा व टूलकिट उत्पादक, कुलूप तयार करणारे, सुतार काम, नौका बांधणारे, शस्त्र निर्माते, सोनार काम, कुंभार काम, शिल्पकार,

दगड तोडणारे इत्यादींचा समावेश आहे व याशिवाय चर्मकार/ बूट तयार करणारा कारागीर, मिस्त्री, टोपली/ झाडू/ चटई निर्माते, बाहुली व खेळणी बनवणारे पारंपारिक कारागीर, केस कर्तनकार म्हणजेच सलून, हार बनवणारे, कपडे धुणारे तसेच टेलर व मासेमारी जाळी निर्मिती करणारे कारागीर व शिल्पकार यांचा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.

 या योजनेत मिळते पाच टक्के दराने तीन लाखापर्यंत कर्ज

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते व हे विनातारण असते. यामध्ये एक लाखाचे कर्ज 18 महिन्याच्या कालावधीसाठी व 30 महिन्यांच्या कालावधी करिता दोन लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये पाच टक्के निश्चित सवलतीचे व्याजदराने कर्ज मिळते. यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यवसायांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा पहिला हप्ता घ्यायला पात्र असतात.

ज्यांनी पहिला हप्ता घेतला व लोन खाते व्यवस्थित ठेवले तर अशा लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये डिजिटल व्यवहारांचा वापर करणे देखील यामध्ये बंधनकारक आहे.

 या योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क

तुम्हाला देखील पीएम विश्वकर्मा योजनेची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही..

1800-2677-777 या नंबरवर फोन करू शकता.

 किंवा

[email protected] या मेल आयडीवर मेल करून तुम्ही ईमेल द्वारे देखील माहिती मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe