शेतीशी निगडित असलेल्या व्यवसायांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असून या जोडधंद्यांना प्रोत्साहन मिळावे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढव व्हावी हा सरकारचा प्रामुख्याने उद्देश आहे. जोडधंद्यांमध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन तसेच शेळीपालन व पशुपालन व्यवसाय केला जातो.
परंतु आता काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेला मधमाशी पालन व्यवसाय देखील महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा उद्योग आहे. त्यामुळे मधमाशी पालन उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यांमध्ये राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून मध केंद्र योजना राबविण्यात येत असून व्यावसायिक तत्त्वावर मध उद्योग करणारे मधपाळ तयार करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
मधमाशी पालनासाठी अनुदान मिळवण्याकरिता पात्रता आणि प्रमुख घटक
वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा..
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.
2- तसेच अर्जदाराकडे स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल.
3- तसेच अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेकरिता..
1- अर्जदार हा वैयक्तिक केंद्र चालक असावा.
2- शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी.
3- वय 21 वर्षापेक्षा जास्त नसावे.
4- तसेच अशा व्यक्तीच्या नावे अथवा त्या कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे कमीत कमी एक एकर शेत जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराकडे मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा त्याच्याकडे असाव्यात.
केंद्र चालक संस्थाकरिता अर्जदार हा..
1- या अंतर्गत लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी.
2- संस्थेच्या नावे मालकीचे किंवा दहा वर्षाकरिता भाडेतत्त्वावर घेतलेली कमीत कमी एक एकरभर शेती असणे गरजेचे आहे किंवा संस्थेच्या नावे आता भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौरस फूट चांगली सुयोग्य इमारत असणे गरजेचे आहे.
3- संबंधित संस्थेकडे मधमाशी पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी.
वैयक्तिक केंद्र चालकासाठी महत्त्वाच्या अटी
1- अर्जदार किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.
2- अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
3- तसेच अर्जदाराकडे स्वतःच्या नावे एक एकर जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असावी.
4- महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे नवीन लाभार्थींना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा देखील असावी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराकडे आधार कार्ड तसेच मतदान कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मधमाशी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर, जन्माचा दाखला आणि शाळेचा दाखला आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे कराल?
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्हा कार्यालयातील खादी व ग्रामोद्योग विभागांमध्ये जावे लागेल.
2- त्या ठिकाणाहून तुम्हाला मध केंद्र अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागतो.
3- अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरावी.
4- अर्जसोबत सांगितलेली सगळी आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत जोडावी.
5- नंतर तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करावा लागेल.
या तारखेपर्यंत करा अर्ज व घ्या 50% अनुदानाचा लाभ
तुम्हाला देखील मधमाशी पालन व्यवसाय करायचा असेल तर वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत व यासाठी जास्तीत जास्त शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांनी 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात येत आहे