PPF Scheme : तुमच्याकडेही असतील 1 कोटी रुपये ! ना म्युच्युअल फंड ना स्टॉक मार्केट, ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक

Updated on -

PPF Scheme : सध्या बाजारात पैसे गुंतवण्याचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. यात काही खासगी ऑप्शन तर काही सरकारी पर्याय उपलब्ध आहेत. उदा. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, एफडी, खासगी कंपनीच्या एफडी भारतात कॉर्पोरेट एफडी आदी.

परंतु काही फंडींगमध्ये रिस्क असते. पैसे रिटर्न किती मिळतील याची गॅरंटी नसतेच. परंतु यात एक पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा पर्याय पैसे गुंतवणुकीसाठी चांगला आहे. याची सर्वात खास गोष्ट अशी आहे की यात जबरदस्त रिटर्न तर मिळताच पण यात कसलीही रिस्क नसते.

सरकारी असल्याने तुमचे पैसे खात्रीपूर्वक तुम्हाला रिटर्न मिळतील. यात गुंतवणूक करून तुम्ही मॅच्युरिटीवर 40 लाख 68,000 रुपयांचा फंड उभारू शकता. विशेष म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणूक मॅच्युरिटीच्या पुढे वाढवू शकता आणि 1 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभी करू शकता. कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत PPF अकाउंट ओपन करता येते.

आधी समजून घ्या की 40 लाख रुपये कसे जमा होतील

PPF वर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. यात तुम्ही वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही रक्कम दरमहा विभागून देखील जमा करू शकता. जर तुम्ही या पद्धतीने पैसे जमा करत राहिले तर 15 वर्षांनंतर मॅच्युरिटी होते.

या मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे 40 लाख 68 हजार रुपये मिळतील. याचा एक नियम आहे की तुम्हाला वर्षभरात या खात्यात कमीतकमी 500 रुपये तरी भरावे लागतीलच. असे न केल्यास खाते बंद होईल.

आता समजून घ्या की 1 कोटी रुपये कसे जमा होतील

PPF वर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. यात तुम्ही वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये व्याजावर देखील व्याज मिळते अर्थात चक्रवाढ व्याजाप्रमाणे व्याज मिळते.

तुमची मॅच्युरिटी 15 वर्षानंतर होते पण त्यावेळी पैसे न काढता आणखी 10 वेळ वाढवून घ्या व गुंतवणूक करत राहा. तुम्ही सलग 25 वर्षे 1.5 लाख रुपये प्रति वर्ष यात भरत राहिल्यास 37,50,000 रुपये तुमचे जमा होतील.

25 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर ही रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. म्हणजेच 37,50,000 रुपयांवर तुम्हाला 68,58,000 रुपये व्याज मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe