Post Office : फक्त व्याजातूनच कराल कमाई, पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Published on -

Post Office Time Deposit : सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल तर आजची बातमी तुमच्या फायद्याची आहे, आज आम्ही अशी एक गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला सुरक्षेसह जबरदस्त परतावा देत आहे.

आम्ही पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेबद्दल बोलत आहोत. पोस्ट ऑफिस सध्या टाइम डिपॉझिटवर उत्तम परतावा ऑफर करत आहे, तसेच या योजनेवर कर सवलतीचा देखील लाभ मिळतो, या योजनेत तुम्हाला व्याजाच्या रूपात दरवर्षी चांगले उत्पन्न तर मिळतेच तसेच तुम्ही मुदतपूर्तीनंतर बक्कळ निधीही जमा करू शकाल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, या खात्यात फक्त 1 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला एकूण सुमारे 41500 रुपये व्याज मिळतील. चला याबद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊया…

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेसारखी असते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ते 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी उघडले जाऊ शकते. यात व्याज वार्षिक आधारावर दिले जाते आणि त्रैमासिक आधारावर गणना केली जाते. येथे किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत ती वाढवता येते.

पोस्ट ऑफिस एफडी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट खात्यात 1 लाख रुपये जमा केले, तर सध्याच्या 7 टक्के दराने, त्याला पाच वर्षांत एकूण 41478 रुपये व्याज मिळतील. ही योजना पाच वर्षांनी पूर्ण झाल्यावर त्याला हे पैसे त्याच्या बचत खात्यात परत मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe