Fixed Deposit : सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, एसआयपी, इत्यांदीचा समावेश आहे, या योजना गुंतवणूकदरकांना खूप चांगला परतावा ऑफर करतात, असे असले तरी देखील देशातील अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता, एफडीमध्ये परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा सर्वात सुरक्षित मानली जाते.
अशातच गेल्या काही दिवसांपासून एफडीवरील व्याजदरात वाढ सुरु झाली आहे, अनेक मोठ्या बँकांनी आपल्या एफडीवर व्याजदरात सुधारणा केली आहे.
यामुळे आता गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह जास्त नफा कमवण्याची संधी मिळते. दरम्यान, तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही अशा काही बँका सांगणार आहोत, ज्या 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा ऑफर करत आहेत.
ICICI बँक
ICICI बँक FD वर 3 ते 7.2 टक्के कालावधीनुसार व्याजदर देते. तसेच 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.20 टक्के व्याज देते. आणि 2 वर्ष ते 5 वर्षांच्या FD वर 7 टक्के, 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर 6.7 टक्के व्याज देते. तुम्हाला व्याजदर कालावधीनुसार दिले जाते.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक दर वर्षी 3 ते 7.25 टक्के व्याज देत आहे. 18 ते 21 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के, 2 वर्षे, 11 महिने आणि 35 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के, त्याच वेळी, बँक 4 वर्षे 7 महिने ते 55 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज देत आहे. तर एक वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर 6.6 टक्के व्याजदर आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा एफडीवर किमान ४.२५ टक्के आणि कमाल ७.२५ टक्के व्याज देते. 2 ते 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याजदर देत आहे. बँक ३९९ दिवसांच्या एफडीवर ७.१५ टक्के वार्षिक व्याज देत आहे. तर बँक ३६० दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि १-२ वर्षांच्या एफडीवर ६.८५ टक्के व्याज देते.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक SBI सर्वसामान्यांना किमान 3.5 टक्के आणि कमाल 7 टक्के व्याज देत आहे. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. बँक 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7 टक्के, 3 ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के, 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.5 टक्के, 1 ते 2 वर्षांच्या दरम्यान FD वर दरवर्षी 6.8 टक्के व्याज देत आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक एफडीवर किमान 4 टक्के आणि कमाल 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक 365 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे. तसेच 180 दिवसांच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. 2-3 वर्षांच्या दरम्यान FD वर 7 टक्के, 3 ते 4 वर्षांच्या FD वर 6.5 टक्के, 4 ते 7 वर्षांच्या FD वर 6.25 टक्के व्याज देत आहे.