चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी- “राज्यात महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करत आहोत. कोणत्याही पक्षाकडून चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे. कारण अशा चुका संपूर्ण महायुतीवर परिणाम घडवतात. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश ही आपली जबाबदारी आहे आणि त्याचा सन्मान करणं अत्यावश्यक आहे, चुका करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा,” असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च … Read more

ग्रो मोअर कंपनी घोटाळ्यातील मेन सुत्रधाराकडून PSI आणि तीन अंमलदारांनी उकळले १ कोटी ५० लाख रूपये, चौघांनाही सेवेतून केले निलंबीत

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक व तीन अंमलदारांनी ग्रो मोअर कंपनीच्या गुन्ह्यातील आरोपीकडे जानेवारी २०२५ मध्ये गुन्हा न दाखल करण्यासाठी दीड कोटी रुपये घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपनिरीक्षकासह चौघांना तत्काळ सेवेतून निलंबित केले. पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोज गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे (सर्व नेमणूक, … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६० क्विंटल फळांची आवक, डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २६० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची सर्वाधिक ६१ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३१ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची अडीच क्विंटल आवक झाली होती. संत्र्यांना प्रतिक्विंटल … Read more

नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीची सखोल चौकशी करू, गुंतवणूकदारांनी तक्रारी करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

शिर्डी- ग्रो मोअर कंपनीमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य भागांतील शेकडो गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी फसवणूक प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. या वेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब … Read more

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा बँकेस नाबार्डकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा पुरस्कार

अहिल्यानगर- नाबार्डच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना नाबार्डने पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा बँक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) पुणे येथे केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जिल्हा बँक श्रेणीतील सर्वोत्तम … Read more

SP सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने एका महिन्यात ५८ ठिकाणी टाकले छापे, २६९ जणांना ताब्यात घेत तब्बल ६ कोटींचा मुद्देमाल केला जप्त,

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने साधारण एका महिन्यात जिल्हाभरात ५८ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे घातले. तब्बल २६९ जणांना ताब्यात घेऊन ५ कोटी ९७ लाख ३ हजार २६३ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ जून ते १९ जुलै दरम्यान केली. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी मिळणार संधी, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

अहिल्यानगर- कृषी विस्तार कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे योजना राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्याकरिता महिला १, केंद्र/राज्य कृषी पुरस्कार प्राप्त / पीक स्पर्धा विजेते शेतकरी १, इतर शेतकरी ३ अशा एकूण ५ शेतकऱ्यांचा देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी संधी मिळणार आहे. दौऱ्याकरिता पात्र असलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्ताव ३० जुलै २०२५ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या ८२ तक्रारी, पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अहिल्यानगर- चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले विविध कंपन्यांच्या वाणाचे बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. यावर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने ७६ शेतकऱ्यांच्या शेतात स्थळ भेटी देऊन पाहणी केली आहे, अशी माहिती जिल्हा … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा, शेवगावच्या सकल धनगर समाजाच्यावतीने निवेदन

निंबेनांदूर- पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीने फेसबुकवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने सदर व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली. गोपाळराव उभे या व्यक्तीने फेसबुकवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने संपूर्ण धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे राजमाजाप्रती आदर असणाऱ्या समाजभावनेला ठेच बसली असून, यामुळे सामाजिक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार २७ जुलैला करणार राहुरी तालुक्याचा दौरा, शेतकरी मेळाव्यानिमित्त लावणार उपस्थिती

राहुरी- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे २७ जुलै २०२५ रोजी राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते बाजार समितीने बांधलेल्या शेतकरी भवन आणि उपहारगृह यांचे उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. … Read more

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अहिल्यानगर तालुक्याची जम्बो कार्यकारिणी केली जाहीर, सर्व भागातील कार्यकर्त्यांना दिली संधी

अहिल्यानगर- अहिल्यानगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगर तालुक्यासाठी मंडळनिहाय जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारीणीमध्ये तरुणांना तसेच सर्व भागात न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. तालुक्यातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आगामी निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला निश्चितपणे होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू … Read more

पाथर्डी तालुक्यातील कान्होबावाडी शाळेत आठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक तर पहिली अन् तीसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही

करंजी- तालुक्यातील कान्होबावाडी येथे प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एक सहशिक्षक आहे. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या शाळेत तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी केंद्रातील करंजीपासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण देणारी शाळा आहे. … Read more

जोरदार पावसामुळे अंबोली घाटातील धबधबे पर्यटकांना घालताय भुरळ, घाटातील निसर्गसौदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी

कोल्हापूर- निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्राचे ‘प्रतिमहाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे आंबोली धबधबा आणि परिसर होय. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे हा प्रसिद्ध धबधबा जूनपासूनच प्रवाहित झाला. विशेष म्हणजे जुलैच्या सुरुवातीलाही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने हा धबधबा जोरदार कोसळत आहे. वरून पडणारे पाणी, पाण्याचा शुभ्र प्रवाह आणि सर्वत्र पसरलेली दाट धुक्याची चादर असे काहीसे मनोहारी … Read more

वांबोरी चारीला उद्यापासून पाणी सुटणार, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मागणीची पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली तात्काळ दखल

करंजी- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मुळा धरणातून बुधवार (दि. २३) रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा धरणात २० हजार दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून, उजवा व डाव्या कालव्यामधूनदेखील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. वांबोरी चारी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे … Read more

ड्रोनचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही विखे पाटील यांचा कडक इशारा

श्रीरामपूर आणि राहाता तालुक्‍यात बेकायदेशि‍रपणे रात्री ड्रोन व्‍दारे शुटींग घेणा-या व्‍यक्तिंचा शोध घ्‍या. ड्रोन यंत्रणेच्‍या विरोधात कराव्‍या लागणा-या कारवाईसाठी आवश्‍यक असलेली साधन सामुग्री उपलब्‍ध करुन, या व्‍यक्तिंविरोधात कठोर कारवाई करा अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिल्‍या आहेत. राहाता आणि श्रीरामपूर तालुक्‍यात रात्री उशिरा ड्रोनव्‍दारे घि‍रट्या घालून भितीचे वातावरण निर्माण … Read more

अहिल्यानगर शहरातील वडगाव गुप्ता आणि एमआयडीसीमध्ये अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर- शहरातील वडगाव गुप्ता बायपास रस्त्यावर आणि एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे अपघात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर इशारा देत असून, वाहतूक शिस्त आणि पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उपचारादरम्यान मृत्यू एमआयडीसी येथील गजानन कॉलनीजवळ १६ जुलै रोजी घडलेल्या एका अपघातात मधुकर प्रल्हाद तंमचे (वय ४९, रा. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीत खरिप पिके पावसाअभावी धोक्यात

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून, तत्काळ नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे. अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात … Read more