शहिद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक उभे राहावे, संगमनेर शहर काँग्रेस कमिटीची मागणी

संगमनेर- तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल बुधवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव … Read more

कोपरगाव तालुक्यातील वनविभागाच्या वखारीवर धाडी, धडक कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांची उडाली धांदल

पुणतांबा- कोपरगाव वनपरीक्षेत्रातील पुणतांबा आणि रुई येथे अवैधरित्या लाकूड कटाई आणि अवैध आरागिरणी चालू असल्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींमुळे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव वनपरिक्षेत्रातील पथकाने पुणतांबामधील वखारींवर नुकतीच धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांबामधील … Read more

मुंबईच्या समुद्रात उभारणार देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळ ! काय आहे फडणवीसांचा मेगा प्लॅन?

मुंबईकरांसाठी एक भन्नाट बातमी आहे लवकरच आपल्याला समुद्रावरच एक नवं, भारी विमानतळ मिळणार आहे! हे देशातलं पहिलंच ऑफशोअर (समुद्रात उभं राहिलेलं) विमानतळ असेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील हे तिसरं विमानतळ असणार असून, लवकरच त्याचं काम सुरू होणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये … Read more

धन आणि संतती सुखासाठी गुरुवारी करा ‘हा’ चमत्कारी उपाय; गुरुच्या कृपेने पूर्ण होतील सर्व मनोकामना!

गुरुवारचा दिवस हा बृहस्पती किंवा गुरु ग्रहाचा मानला जातो. या दिवशी योग्य व्रत व पूजन केल्यास फक्त पुण्यच मिळत नाही, तर संततीसुख, धनसंपत्ती आणि घरात सौख्य-शांतीही प्राप्त होते. अग्निपुराण व स्कंदपुराणातही गुरुवारी व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. विशेषतः श्रावण महिन्यातील गुरुवार तर अतिशय शुभ मानले जातात. या वर्षी श्रावणातील कृष्ण पक्षातील सप्तमी 17 जुलै रोजी … Read more

आश्चर्यजनक परंपरा! देशातील 5 अनोखी मंदिरं, जिथे प्रसाद म्हणून दिले जाते मटण आणि मद्य

हिंदू धर्म म्हटलं की आपल्या मनात सात्विकतेचं एक पवित्र चित्र उभं राहतं. फुलं, फळं, दूध, तुप, साखर आणि गोड प्रसाद. पण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात काही परंपरा इतक्या अनोख्या आहेत की त्या ऐकून क्षणभर आपण गोंधळून जाऊ शकतो. खरं सांगायचं झालं तर, काही मंदिरांमध्ये देवतेला अर्पण म्हणून मांस, मासे आणि अगदी मद्यसुद्धा दिलं जातं. आणि … Read more

संगमनेरमधील ‘त्या’ ठेकेदार कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

संगमनेर- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे … Read more

सुपा परिसरातील नागरिकांना जादा परतावा देण्याच्या नावाखाली ‘सिस्पे कंपनी’ ने घातला ४०० कोटींचा गंडा, गुंतवणूकदार आक्रमक

जातेगाव- सुपा येथील ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळल्याने सुपा परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये बुडाल्यात जमा आहे. मोठा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सुपा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत. ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळला असून, सुमारे चार महिन्यांपासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका, अशा भूलथापा दिल्या जात … Read more

काँगेस पक्षाला विचारधारा आहे, पक्ष संकटात असतांना अनेक जण सोडून गेले मी गेलो नाही, भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर- १९८५ साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आपण निवडून आलो. मागील ४० वर्ष राजकारणात राहिलो. पराभव हा अनपेक्षितच होता. इतकी मोठी संधी तालुक्यातील जनतेने मला दिली, १८ वर्ष मंत्रिमंडळात राहिलो. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरही मला मोठी संधी दिली. मतदार संघातही मी चांगली विकास कामे केली, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत … Read more

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसेच गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे, श्रीरामपूरमध्ये विविध संघटनाचे निवेदन

श्रीरामपूर- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जावून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना काल बुधवारी देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे शाईफेक करून भ्याड हल्ला करण्यात आला. … Read more

मुल्ला कटर अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा श्रीरामपूर बंद करू, शिष्टमंडळाचा इशारा

श्रीरामपूर- शहरात सध्या मुल्ला कटर अत्याचार प्रकरणामुळे तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावर साक्षीदार महिलेला धमकी दिल्याचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे. त्यांनी हा गुन्हा राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सत्य बाहेर यावे … Read more

श्रावणात एकाच वेळी तयार होतोय 3 दुर्मीळ योग! मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त लाभ

यंदाच्या श्रावण महिन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी संयोग घडतोय. मालव्य, बुधादित्य आणि गजलक्ष्मी या तीन राजयोगांचा एकत्रित प्रभाव. हे योग केवळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेच नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनातही मोठे बदल घडवू शकतात. पैशाच्या बाबतीत अडकलेली चाके अचानक वेगाने फिरू लागतात, आणि ज्यांच्या राशींवर या योगांचा प्रभाव असेल, त्यांचं नशीब आभाळालाही गवसणी घालेल. या विशेष … Read more

प्रेमभंग असो किंवा मैत्रीतील विश्वासघात…, भूतकाळातील गोष्टी मागे सरता सरत नाहीत? वाचा प्रेमानंद महाराजांचा अमुल्य सल्ला!

जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकतो. काही दुःखद, काही गोड, पण बहुतांशी अशा की त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. अशाच वेळी, संतांची वाणी आणि त्यांचा अनुभव आपल्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येतो. राधावल्लभ पंथाचे पूज्य संत श्री प्रेमानंद महाराज हे असेच एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, जे भक्तांच्या शंकांना केवळ उत्तर देत नाहीत, तर … Read more

फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये धमाका! Samsung ते Motorola…, 50MP कॅमेरासह टॉप-5 स्मार्टफोन अवघ्या ₹8000 मध्ये

जर तुम्ही कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेल्या Flipkart GOAT सेलमुळे तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. अवघ्या 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Samsung, Motorola, Redmi, Poco आणि Realme सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे फोन केवळ किमतीतच नव्हे, तर फीचर्सच्या बाबतीतही … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा कोपरगाव तालुक्यात छापा, अवैध वाळू, दारुसह ६२ लाखांचा मुद्देमाल पकडला

कोपरगाव- जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत कोपरगावात चार ढंपर व एक ट्रॅक्टरसह अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर काल बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाथर्डी येथे देखील अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने काल बुधवारी … Read more

पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण, खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

पारनेर- पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण असून, येथे दर्जेदार साहित्याची परंपरा लाभलेली आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनी केले. गटेवाडी येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गटेवाडी येथील नवोदित लेखक अशोक किसन पवार यांनी लिहिलेल्या ‘आणि रामा कलेक्टर झाला’ या कादंबरीचे प्रकाशन खा. लंके व आयकर सहआयुक्त विष्णू औटी … Read more

ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाखाली अनेकांना कोट्यावधींचा गंडा घालणारा म्होरक्या भूपेंद्र सावळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर- जादा परताव्याचे आमिष दाखवून गुतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. भूपेंद्र राजाराम सावळे (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) असे त्याचे नाव आहे. तो नंदूरबार येथील कारागृहात होता. दरम्यान, त्याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून त्याला बुधवारी राहाता येथील विशेष … Read more

अहिल्यानगरमधील ‘हे’ गाव होणार राज्यातील पहिले रोड मॉडेल व्हिलेज, मोजणीस प्रशासकीय मंजूरी

पारनेर- ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यातील बाभुळवाडे गाव रोड मॉडेल व्हिलेज करण्यासाठी गावात विशेष ग्रामसभा घेऊन गाव नकाशावरील शेतरस्त्यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी गावशिवार फेरी काढत पाहणी केली. यावेळी तालुका भूमी अभिलेखचे उपाधीक्षक माधवराव पाटील यांनी शेतरस्त्यांच्या मोजणीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे बाभुळवाडे गाव ते लाणीमावळा शिवरस्ता, बाभुळवाडे गाव ते वडझिरे शिवरस्ता, … Read more

तू माझ्या स्वप्नात येते, मला तुझ्याशी लग्न करायचंय, असं म्हणत अहिल्यानगरमधील महाराजाने केला विनयभंग

अहिल्यानगर- एमआयडीसी परिसरात एका मठात कुटुंब देवदर्शनासाठी जात होते. तिथे संबंधित व्यक्तीची ओळख झाली. तो महाराज असल्याचे सांगता होता. त्याने मुलीच्या इंस्टाग्रामवर वारंवार लग्नाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कानिफ सुरेश राऊत (रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात … Read more