Ahilyanagar Breaking : जेवण करून चिमुरडी हात धुवायला बाहेर गेली, बिबट्याने पालकांसमोर ओढत नेली.. अहिल्यानगरमधील घटना

राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात नरभक्षी बिबट्याने चिमुकलीचा बळी घेतलाय. स्नेहल संतोष राशीनकर (वय 7) असे या चिमुकलीचे नाव आहे. जेवण करून हाथ धुण्यासाठी बाहेर गेलेल्या स्नेहलवर पाण्याच्या टाकी लगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. अधिक माहिती अशी की राहाता तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे दि 26 मार्च … Read more

राहुरीतली संतापजनक घटना ! विखे पाटलांचं थेट प्रशासनाला निर्देश, कारवाई झालीच पाहिजे

राहुरी शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही अत्यंत निंदनीय घटना आहे. या कृत्याचा तीव्र निषेध करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. ही घटना घडल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण माहिती घेतली आणि या प्रकरणातील आरोपींना शोधून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या … Read more

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

मुंबई, दि. २७ : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित … Read more

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता शाळा सकाळी ९ ते ४ भरणार, तासिकाही बदलल्या..

शालेय कामकाजाच्या २३४ दिवसांची निश्चिती झाल्यानंतर शालेय वेळापत्रक सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद करून देण्यात आले आहे. यानुसार आता राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये प्रस्तावित वेळापत्रक व तासिका यांचे नियोजन देताना सकाळी ९ ते दुपारी ३.५५ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती समजली आहे. सकाळी ९ ला शाळा भरल्यानंतर ९ ते ९.२५ या कालावधीमध्ये परिपाठाचे नियोजन … Read more

देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्ती आपल्याकडील पैसा कुठे गुंतवतात ?

UHNI Investment

UHNI Investment : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर मार्केट मधील ही अस्थिरता गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याचा सर्वात जास्त फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसतोय. यामुळे श्रीमंत आणि अति श्रीमंत व्यक्ती सुद्धा हैराण झाले आहेत. आता आपण भारतातील अतिश्रीमंत व्यक्ती (UHNIs) शेअर मार्केटमधील अस्थिरतेचा फायदा घेत आपल्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढवत आहेत. कोटक … Read more

जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव

मुंबई, दि. २७ :- जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट … Read more

Ahilyanagar News : ना वाहन क्रमांक, ना डेपोचे नाव तरीही लालपरी सुसाट ! परिवहन महामंडळाकडूनच नियम धाब्यावर

वाहतुकीसंदर्भात अनेक नियम बनवलेले आहेत. सर्वांनाच हे नियम सारखे आहेत. असे असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनच हे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असच काहीस दृश्य अहिल्यानगर शहरात पाहावयास मिळाले. एसटी बसच्या पाठीमागील बाजूस वाहन क्रमांक नाही, सदर बस कोणत्या डेपोची आहे, याचाही उल्लेख नाही. तरीही ही लालपरी सुसाट रस्त्यावर धावताना दिसली. सर्वसामान्यांचा प्रवासाचा … Read more

Ahilyanagar News : तहसीलदारांच्या निलंबनानंतर अहिल्यानगरमध्ये पुन्हा मोठी कारवाई ! ‘तो’ मोठा अधिकारी लाच घेताना ताब्यात

श्रीगोंदा : श्रीगोंद्यांचे दुय्यम निबंधक सचिन खताळ लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत.पंधरा हजार रुपयांची मागणी करत तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडले आहे. तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार व मागील दस्त नोंदणीची बाकी … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! उद्या ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल

Pune

Pune Traffic News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, स्वराज्याचे धाकले छत्रपती शंभूराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरूर तालुक्यातील वाहतुकीत महत्त्वाचा बदल झाला आहे. उद्या अर्थातच 28 मार्च 2025 रोजी रात्री दहा वाजल्यापासून हा बदल लागू राहणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरूर तालुक्यातील वाहतुकीत नेमका … Read more

संगमनेर खुर्द वि. का.सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड

संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर खु वि.का. सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदारांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती साधली आहे. आणि आता या सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची … Read more

चंदनापुरी मध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महानुभव सत्संग सोहळा सुरू

संगमनेर (प्रतिनिधी)– हजारो अनुयायांची उपस्थिती, शिस्तबद्ध वातावरण, पारंपारिक वाद्यांचा गजर, पुष्पवृष्टी, तसेच विद्यार्थ्यांच्या झांजरी पथकासमवेत झालेल्या मिरवणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महानुभव पंथातील सत्संगात श्रद्धेय परमपूज्य मोठे बाबा यांची भव्य मिरवणूक संपन्न झाली असून या मिरवणुकीचे स्वागत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हा सत्संग सोहळा अध्यात्मिक ऊर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात … Read more

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 12 एप्रिलपासून ‘या’ रेल्वे गाड्या रुळावर धावणार नाहीत, कारण काय ?

Pune Railway News : मार्च महिना आता संपण्यात जमा आहे, लवकरच एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्याबरोबरच उन्हाळी सुट्ट्या देखील स्टार्ट होतील. असे असतानाच मात्र पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुढल्या महिन्यात अर्थातच एप्रिलमध्ये पुण्याहून कोलकाता कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळ बंद राहणार आहेत. 12 एप्रिल पासून काही गाड्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ दोन रस्त्यांची नावे बदलणार ! एकाचे नाव गोपीनाथ मुंडे मार्ग तर दुसऱ्याला….

अहिल्यानगर शहरातील दोन रस्त्यांचे नामकरण होणार आहे. यातील एकाला लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग तर दुसऱ्याला स्व. रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. हे दोन्ही रस्ते अहिल्यानगर महापालिका हद्दीतील आहेत. प्रभाग २ मधील निर्मलनगर भागातील डॉ. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एसटीडी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील … Read more

मुंबई-पुणे-बेंगळुरू दरम्यानचा प्रवास होणार वेगवान ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 23 Railway Station थांबा घेणार!

Mumbai Bangalore Special Train

Mumbai Bangalore Special Train : मार्च महिना येत्या दोन दिवसात संपणार आहे. थोड्याच दिवसात देशात आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील आणि याच अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर नवीन स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि यंदा देखील उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. … Read more

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

HPCL BHARTI 2025

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरतीसाठी एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. … Read more

मुंबई शहराला मिळणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! ‘या’ शहरांमधून धावणार, कसा असणार रूट? पहा…

Mumbai Vande Bharat Sleeper Train

Mumbai Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर दिसणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. मुंबई शहराला देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे. दरम्यान आज आपण मुंबईहून कोणत्या शहरासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ रिंगरोड संदर्भात खासदार नीलेश लंके थेट नितीन गडकरी यांच्या भेटीला…

अहिल्यानगर : अरणगांव, ता. नगर हद्दीमधून गेलेल्या चारपदरी रिंगरोडची पूरक कामे मार्गी लाऊन अरणगांव व परिसरातील रहिवासी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या दैनंदिन दळणवळणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात तसेच वेळप्रसंगी होणारे अपघात टाळावेत अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन केली. याच पूरक कामांसंदर्भात आपण दि.२२ जुलै रोजी आपणास पत्र … Read more

Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध; राहुरी तालुक्यात कडकडीत बंद

काल (दि.२६) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घटना घडली. राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. संतप्त शिवप्रेमींनी तालुका बंदची हाक दिली होती. तालुक्यात आज (दि.२७) कडकडीत बंद पाळण्यात आला. देवळाली प्रवरा येथे यात्रा उत्सव असल्याने दुपार पर्यंत बंद … Read more