महाराष्ट्रातून जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.२०:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेन द्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली, असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊन ने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ३२५ ट्रेनने … Read more

जिल्ह्यात ‘कोरोनामुक्त’ रुग्णांचे शतक; ११० रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (जिमाका) दि. 20 – कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 33 जण काल सायंकाळी (19 मे) आपापल्या घरी परतले. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.२०- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४४ घटना घडल्या. त्यात ८२३व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,११,४१२ गुन्हे नोंद झाले असून २२,४९२ व्यक्तींना अटक करण्यात आली … Read more

रोजगार हमीमुळे लॉकडाऊनचा काळात विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम

नागपूर, दि.20 :  लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 18 हजार 694 कामे प्रत्यक्ष सुरु झाले आहे. मनरेगा … Read more

तलाठी, ग्रामसेवकांना नेमणुकीच्या गावातच राहणे बंधनकारक करा – पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – अनेक गावांच्या कृती समितीमध्ये तलाठी हे सह अध्यक्ष आहेत. पण, हे तलाठी गावात उपलब्धच नसतात त्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांनी त्यांना नेमणूक दिलेल्या गावांमध्येच वास्तव्यास असावे असे आदेश तहसिलदार यांनी काढावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने आयोजित बैठकीवेळी … Read more

विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील दीड हजार कामगार स्वगृही रवाना

अमरावती, दि. 20 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 544 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस आज सायंकाळी सहाच्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. घरी परतण्याचा आनंद व्यक्त करत व ‘भारतमाता की जय’चा घोष करत कामगार बांधव आपल्या गावाकडे परतले. अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी … Read more

लॉकडाऊन काळात रोजगार हमीमुळे विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम

नागपूर, दि.20 :  लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 18 हजार 694 कामे प्रत्यक्ष सुरु झाले आहे. मनरेगा … Read more

शिधापत्रिका नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ

मुंबई, दि.२० मे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी … Read more

‘थँक्यू थोरात साहब’ म्हणत परप्रांतीय मजुरांकडून कृतज्ञता व्यक्त

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

मुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते. … Read more

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

ठाणे दि. 20 – ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात  लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी दिले. ठाणे  जिल्हाधिकारी  कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक … Read more

यंदाचे वर्ष ‘कृषि उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे करणार; शेतीसाठी खते, बियाणे व पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार

नाशिक दि. 20 मे : येणाऱ्या काळात कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक तीव्रतेने जाणवणार आहे, त्यामुळे 2020 वर्ष हे ‘कृषी उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. तसेच खते, बियाणे व त्याच बरोबर शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री … Read more

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करा – पालकमंत्री

अमरावती, दि. 20 : क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळाव्यात. क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशी स्वच्छता, आवश्यक साधने उपलब्ध असली पाहिजेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज … Read more

कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले

देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत. पुणे ग्रामीणचे … Read more

‘त्या’ मूकबधीर भगिनीला घरी पोहोचविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्र्यांची धडपड

अमरावती, दि. 20 : जिल्हा रूग्णालयात दाखल एका मूकबधीर महिलेचे घर शोधून काढण्यासाठी आधार प्रणालीचा व आवश्यक त्या सर्व पर्यायांचा वापर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. या महिलेच्या व्यथेची दखल घेत श्रीमती ठाकूर यांनी आज इर्विन रुग्णालयाला भेट देऊन तिचे मूळ घर शोधण्याच्या प्रयत्नांना … Read more

क्वारंटीनसाठी खासदारांनी दिले स्वत:चे घर

कोल्हापूर, दि. २० : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार श्री. माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील पहिले खासदार असतील. रेड … Read more

उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक

मुंबई, दि. २०: राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. दरम्यान, उद्या दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. … Read more

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

मुंबई, दि.२०: राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. या … Read more