जगात महागाईचा भडका उडालेला असताना, काही देश अजूनही असे आहेत जिथे कमी बजेटमध्ये सुसंस्कृत, साधं आणि समाधानकारक जीवन जगणं शक्य आहे. विशेषतः मुस्लिमबहुल देशांमध्ये, कमी खर्चातही जगण्याची शक्यता अधिक आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या 2025 च्या ताज्या अहवालात अशाच 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे जिथे दरमहा फक्त ₹30,000 ते ₹43,000 मध्येही तुम्ही सहज राहू शकता, तेही परदेशात!

नायजेरिया
या यादीत सर्वप्रथम नाव आहे नायजेरियाचं. हा देश अनेकांसाठी अनोळखी असला, तरी इथल्या स्वस्त जीवनशैलीमुळे त्याला पहिलं स्थान मिळालं आहे. दरमहा केवळ ₹30,312 खर्चात येथे राहता येतं. गरजेच्या गोष्टी सहज उपलब्ध असतात आणि जीवनशैलीही अत्यंत माफक खर्चात जगता येते.
पाकिस्तान
दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान. जरी इथे महागाई वाढत असल्याचं चित्र असलं, तरी एकट्या व्यक्तीचा मासिक खर्च ₹30,483 इतकाच आहे. म्हणजेच, या देशात अजूनही जीवन शक्यतो परवडण्यासारखं आहे.
लिबिया आणि बांगलादेश
लिबिया आणि बांगलादेश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. लिबियामध्ये सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणामुळे अनेक अडचणी आहेत, पण मासिक खर्च केवळ ₹36,033 आहे. बांगलादेश मात्र भारताचा शेजारी असूनही थोडा स्वस्त आहे. इथे ₹36,118 खर्चात तुमचं महिन्याचं बजेट सांभाळता येतं.
आफ्रिकेतील देश
आफ्रिकेतील अल्जेरिया, घाना, चाड हे देशही या यादीत आहेत. या देशांमध्ये मूलभूत गरजांची पूर्तता सुलभतेने करता येते आणि एक शांत, सोपी जीवनशैली शक्य होते. विशेषतः घानामध्ये दरमहा फक्त ₹40,815 खर्च होतो, जे आफ्रिकन स्थिरतेसह एक आदर्श समीकरण तयार करतं.
मध्यपूर्वेतील इजिप्त आणि येमेनसारख्या देशांचाही या यादीत समावेश आहे. इजिप्त हा देश ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे, पण वास्तव्यासाठीसुद्धा तेवढाच परवडणारा आहे ₹42,949 इतक्याच मासिक खर्चात. येमेन जरी अनेक संघर्षांनी ग्रासलेला असला, तरी मासिक खर्च केवळ ₹43,120 असल्यामुळे तोही एक स्वस्त पर्याय आहे.