शुक्राजवळ फिरणाऱ्या 20 लघुग्रहांनी वाढवली चिंता ! शहरे काही मिनिटात उध्वस्त होणार?

Published on -

जगात कितीही तंत्रज्ञान विकसित झालं असलं, तरी आपली पृथ्वी ही अजूनही अनेक अपरिचित आकाशीय संकटांच्या सावलीत वावरत आहे. शास्त्रज्ञांनी नुकतीच दिलेली एक माहिती अशीच धडकी भरवणारी आहे विशेष म्हणजे ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर आपल्याच सूर्यमालेत घडणाऱ्या घटनांचं वास्तव चित्र आहे. आकाशातील एक अनोळखी, विचित्र खेळ सुरू आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे शुक्र ग्रहाजवळ फिरणारे काही प्रचंड लघुग्रह.

ब्राझीलमधील साओ पाउलो विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की, शुक्राच्या आजूबाजूला २० लघुग्रह आढळले आहेत जे एकाचवेळी आकर्षक आणि धोकादायक वाटतात. हे लघुग्रह मुळात मंगळ आणि गुरूच्या मधल्या मुख्य लघुग्रह पट्ट्याचे वाटसरू होते. पण आज हे त्यांच्या मूळ मार्गावर नसून, विचित्र रितीने शुक्राच्या कक्षेत फिरत आहेत. यातल्या अनेक लघुग्रहांची लांबी १४० मीटरपेक्षा जास्त असून, त्यांच्या गतीत आणि मार्गात एक अनिश्चितता आहे जी धास्ती वाटवते.

या लघुग्रहांबाबत वैज्ञानिक ‘सिटी किलर’ असा उल्लेख करत आहेत एकच लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला, तर अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण शहर मातीमोल होऊ शकतं. सध्या त्यांचा थेट धोका नसला तरी, भविष्यात त्यांच्या गतीमध्ये थोडाही बदल झाला, तर ते आपल्यासाठी भयानक ठरू शकतात. आणि हीच गोष्ट अधिक चिंतेची आहे. कोणतीही निश्चित तारीख नाही, कोणतंही ठोस इशारा नाही, पण धोक्याची शक्यता मात्र प्रत्यक्षात आहे.

शुक्र हा पृथ्वीपासून साधारण चार कोटी किलोमीटर दूर आहे. पण या आकाशीय अंतरातही जर एखादा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात आला, तर तो त्याचा मार्ग सोडून सरळ आपल्याकडे वळू शकतो. अशा स्थितीत टक्कर होणं काही अशक्य नाही. संशोधक व्हॅलेरियो कॅरुब्बा यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हे आपण दुर्लक्ष करू नये. एकीकडे भीती वाटली पाहिजेच, पण त्याचबरोबर या सगळ्यावर वैज्ञानिक निरीक्षण आणि नियोजनही सुरू आहे.

शुक्र ग्रहावर मोहीम पाठवून या लघुग्रहांचा अधिक अभ्यास करता येईल, अशी आशा वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. २०२६ पासून सुरु होणारी रुबिन वेधशाळेची निरीक्षण मोहीम त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. जर त्यांना वेळेत हेरता आलं, तर काही टाळता येण्यासारख्या संधी अजून उरलेल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe