फिटनेसचे 5 मंत्र तुम्हालाही ठेवतील मिलिंद सोमणसारख फिट अँड फाईन

Published on -

भारतातील पहिला सुपरमॉडेल, अभिनेता आणि अ‍ॅथलीट म्हणून प्रसिद्ध असलेला मिलिंद सोमण आजही आपल्या फिटनेस आणि युथफुल लूकमुळे चर्चेत असतो. वयाच्या 59 व्या वर्षीही तो अनेक तरुणांपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि ऊर्जावान आहे. पण ही कमाल काही जादूने घडलेली नाही. त्यामागे आहे त्याची शिस्तबद्ध आणि नैसर्गिक जीवनशैली. मिलिंद सोमणच्या 5 खास सवयी आहेत , ज्या त्याला या वयातही फिट आणि फ्रेश ठेवतात.

धावण्याची सवय

 

 

मिलिंदला धावण्याची विशेष आवड आहे. तो रोज अनेक किलोमीटर धावतो. तो फक्त रनिंगच करत नाही, तर अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही भाग घेतो. त्याने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. धावण्यामुळे त्याचा स्टॅमिना मजबूत राहतो आणि शरीर सक्रिय राहते. रोज धावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.

लवकर उठणे

मिलिंद रोज सकाळी 5:30 वाजता उठतो. तो उशिरा झोपण्यावर विश्वास ठेवत नाही. लवकर उठून तो दिवसाची सुरुवात रनिंग किंवा योगाने करतो. यामुळे त्याचे शरीर संतुलित राहते आणि मानसिकदृष्ट्याही तो खूप सकारात्मक राहतो.

वर्कआउट

फक्त रनिंग पुरेसं नाही, म्हणून मिलिंद नियमित वर्कआउट करतो. कार्डिओ, वेट लिफ्टिंग, बॉडीवेट एक्सरसाइज – हे सर्व प्रकार तो आठवड्यातून काही वेळ करतच असतो. वर्कआउटमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळते आणि स्नायूंना मजबूती मिळते.

संतुलित आहार

मिलिंद आपल्या आहारात प्रोटीनयुक्त व नैसर्गिक अन्नघटकांचा समावेश करतो. तो काजू, सुकामेवा आणि हंगामी फळं आवर्जून खातो. शिजवलेले पदार्थ कमी आणि नैसर्गिक व पोषक गोष्टी जास्त असा त्याचा आहार असतो.

तुपाचा समावेश

मिलिंद आपल्या रोजच्या जेवणात तुपाचा समावेश करतो. त्याच्या मते, योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीराला चांगले फॅट्स मिळतात जे चयापचय सुधारतात. तुपामुळे वजन वाढते हे चुकीचे आहे, असं तो सांगतो.

मिलिंद सोमणला त्याच्या या 5 साध्या पण प्रभावी सवयी वयाच्या 59 व्या वर्षीही फिट, तरुण आणि सक्रिय ठेवतात. जर आपणही या सवयी आपल्या आयुष्यात पाळल्या, तर आपली तब्येतही नक्कीच बदलू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News