पुढच्या आठवड्यात 5G स्मार्टफोन्सचा धमाका सेल! 7,999 रुपयांपासून किंमती सुरू, पाहा यादी

Published on -

जर तुम्ही नव्या स्मार्टफोनच्या खरेदीचा विचार करत असाल, तर पुढचा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. भारतात काही नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स आगामी आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होणार आहेत. या यादीत अवघ्या ₹7,999 पासून सुरू होणाऱ्या 5G फोनचाही समावेश आहे. काही फोन्सवर आकर्षक बँक ऑफर्स देखील आहेत. चला पाहूया कोणते फोन्स कुठून आणि किती रुपयांत खरेदी करता येणार आहेत.

Motorola Edge 60

Motorola Edge 60 स्मार्टफोनची विक्री 17 जूनपासून सुरू होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी करता येईल. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत बँक ऑफरसह फक्त ₹24,999 ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.67-इंचाचा POLED वक्र डिस्प्ले, MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, 50 MP फ्रंट आणि 50 MP रिअर कॅमेरा, TurboPower 68W चार्जिंगसह 5,500 mAh बॅटरी मिळते. याला 3 वर्षे OS अपडेट्स आणि 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स मिळणार आहेत.

Vivo T4 Ultra

Vivo T4 Ultra ची विक्री 18 जूनपासून सुरू होणार असून Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाईटवरून हा फोन खरेदी करता येईल. या फोनची किंमत ₹37,999 पासून सुरू होते. मात्र, विविध बँक ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही तो स्वस्तात घेऊ शकता. फोनमध्ये 6.67-इंच Quad-Curved AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर, 50 MP रिअर कॅमेरा, 32 MP फ्रंट कॅमेरा, 90W टर्बो चार्जिंगसह 5,500 mAh बॅटरी मिळते.

Lava Storm Lite 5G

भारतीय बाजारात Lava Storm Lite 5G हा सगळ्यात परवडणारा 5G फोन म्हणून समोर येत आहे. 19 जूनपासून Amazon वर याची विक्री सुरू होईल. 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या याचा एकमेव व्हेरिएंट फक्त ₹7,999 ला मिळणार आहे. MediaTek Dimensity 6400 प्रोसेसरसह, हा फोन भारतातील पहिला असा फोन आहे. यात 6.75 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 50 MP रिअर कॅमेरा, IP64 रेटिंग, आणि 5,000 mAh बॅटरी मिळते.

Lava Storm Play 5G

Lava Storm Play 5G हा फोन 24 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याचा एकमेव 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट ₹9,999 मध्ये Amazon वर खरेदी करता येईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7060 चिपसेट, 6.75-इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 50 MP रिअर कॅमेरा, IP64 रेटिंग आणि 5,000 mAh बॅटरी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!