नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल आणि बजेटही मर्यादित असेल, तर TECNO चा नवीन POVA 7 Series तुमच्यासाठी खूपच आकर्षक ठरू शकतो. हे फोन्स केवळ दिसायला स्टायलिश नाहीत, तर त्यात अशा काही खास गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्ही म्हणाल “हा फोन तर घ्यायलाच हवा!” उद्यापासून म्हणजे 10 जुलैपासून या सीरिजचा सेल सुरू होतोय. या फोनची किंमत देखील फारच आकर्षक ठेवण्यात आली आहे.
TECNO POVA 7 आणि POVA 7 Pro

TECNO POVA 7 आणि त्याचा Pro व्हेरिएंट हे दोन्ही फोन त्यांच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत लक्ष वेधून घेत आहेत. POVA 7 चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 12,999 रुपयांना मिळतोय, तर 256GB स्टोरेजसाठी किंमत आहे 13,999 रुपये. हा फोन तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये मॅजिक सिल्व्हर, ओएसिस ग्रीन आणि गीक ब्लॅक मध्ये मिळेल. त्याचवेळी, POVA 7 Pro जरा अधिक प्रीमियम दर्जा घेऊन येतो. 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसाठी किंमत आहे 16,999 रुपये, तर 256GB साठी 17,999 रुपये. यातही तुम्हाला डायनॅमिक ग्रे, निऑन सायन आणि गीक ब्लॅक असे कलर ऑप्शन्स मिळतील. हे दोन्ही मॉडेल्स फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहेत.
या फोनच्या डिस्प्लेबाबत बोलायचे झाल्यास, दोघेही जवळपास 6.78 इंच स्क्रीनसह येतात, पण POVA 7 Pro मध्ये AMOLED पॅनल आणि 1.5K रिझोल्यूशनसह 144Hz रिफ्रेश रेट आहे, जो पाहताना फारच स्मूथ वाटतो. POVA 7 मध्ये फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले असून त्याचाही स्क्रीन अनुभव फारच भन्नाट आहे.
डिझाईन
डिझाइनचा विषय निघाला, तर या फोन्समध्ये दिलेला डेल्टा-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल पाहून कोणाचंही लक्ष अडकून राहील. TECNO ने याला “मल्टी-फंक्शनल डेल्टा लाइट इंटरफेस” म्हटलं आहे, ज्यात तब्बल 104 मिनी एलईडी लाईट्स आहेत. या लाईट्स म्युझिक प्ले होत असताना, कॉल येताना, नोटिफिकेशन मिळाल्यावर किंवा फोन चार्जिंग करताना चमकतात.
AI असिस्टंटदेखील TECNO चा ‘एला’ या नावाने फोनमध्ये इनबिल्ट आहे, जी वापरकर्त्यांच्या भाषेची गरज ओळखून विविध भारतीय भाषांमध्ये संवाद साधते. मेसेज टायपिंगपासून ते मजकूराचे भाषांतर करण्यापर्यंत, ‘एला’ तुमचं काम खूपच सोपं करते.
या फोनची आणखी एक खास बाब म्हणजे तो नेटवर्कशिवायसुद्धा कॉल करू शकतो. हे शक्य होतं टेक्नो इंटेलिजेंट सिग्नल हबमुळे, ज्यात 4×4 MIMO, VoWiFi Dual Pass यासारखी तंत्रज्ञानं आहेत. म्हणजे तुम्हाला सिग्नलची चिंता करण्याची गरज नाही, कॉलिंग चालूच राहणार.
कॅमेरा
कॅमेराच्या बाबतीतही TECNO ने कुठेही तडजोड केलेली नाही. POVA 7 Pro मध्ये 64 मेगापिक्सेल Sony IMX682 सेन्सर दिला असून त्यासोबत 8 मेगापिक्सेल दुसरी लेन्स आहे, ज्यात व्लॉग मोड आणि ड्युअल व्हिडिओ फिचर आहे. POVA 7 मध्ये 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा असून तो प्रत्येक प्रकाशात स्थिर आणि स्पष्ट फोटो देतो.
शेवटी, बॅटरीवर नजर टाकल्यास दोन्ही फोन्समध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे POVA 7 Pro मध्ये 30W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील आहे, जो या श्रेणीतील फारच दुर्मिळ फिचर आहे.