बॉलिवूडमधील शांत आणि जबरदस्त फिट दिसणारा अभिनेता जॉन अब्राहम सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत नुकतंच एक आलीशान घर खरेदी केलंय. जे पाहिलं की डोळे दिपतात. मुंबईसारख्या शहरात, जिथे काहीशे चौरस फुटांची जागाही सोन्याच्या भावात मिळते, तिथे जॉन अब्राहमने 4,000 चौरस फूटाचं ‘व्हिला इन द स्काय’ नावाचं भव्य पेंटहाऊस उभारलं आहे.

‘व्हिला इन द स्काय’
हे घर केवळ त्याच्या लक्झरी आणि श्रीमंतीचं प्रतीक नाही, तर त्याच्या सौंदर्यदृष्टीचं आणि सुसंस्कृत जीवनशैलीचंही सुंदर दर्शन घडवतं. त्याच्या भावाने अॅलन अब्राहमने आर्किटेक्ट अनाहिता शिवदासानीसोबत मिळून हे स्वप्नवत घर डिझाइन केलं आहे. एवढंच नव्हे, तर या पेंटहाऊसला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरल डिझाइन’कडून ‘सर्वोत्कृष्ट घर’ पुरस्कार मिळाला होता.
अरबी समुद्राकाठी वसलेलं हे डुप्लेक्स पेंटहाऊस केवळ दृश्यांनी मंत्रमुग्ध करणारं नाही, तर त्याच्या अंतर्गत सजावटीनेही मन मोहवतं. भिंतींना आणि फर्निचरला नैसर्गिक लाकूड, विशेषतः सागवान वापरलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण घर पर्यावरणपूरक आणि ताजं वाटतं.
जॉनचा हा पेंटहाऊस फक्त एक निवासस्थान नाही, तर त्याच्या जगण्याच्या शैलीचं व्यक्तिमत्व आहे. वरच्या मजल्यावर खास ब्लाइंड ग्लासने वेढलेली मीडिया रूम आहे जिथे तो सिनेमे पाहतो, स्क्रीनिंग घेतो किंवा शूटिंगसाठी खास सेटअप ठेवतो. त्याचं संगीतावरचं प्रेमही घरात दिसून येतं. कारण त्याच्या पेंटहाऊसमध्ये 52 स्पीकर्सची अत्याधुनिक साउंड सिस्टम बसवलेली आहे. ही संगीतप्रणाली संपूर्ण घरात गुंजते, अगदी समुद्राच्या लाटांबरोबर सुरांमध्ये मिसळून.
जॉन अब्राहमची एकूण संपत्ती
त्याच्या या आलिशान दुनियेइतकाच प्रभावशाली आहे त्याचा फिटनेस. 52 वर्षांचं वय असूनही, त्याची शरीरयष्टी बघून कोणीही चकित होईल. आठवड्यातील सातही दिवस तो नियमित व्यायाम करतो, कार्डिओपासून वेटलिफ्टिंगपर्यंत. जॉन अनेकदा म्हणतो, “माझं शरीर हेच माझं मंदिर आहे.” आणि त्याने ते मंदिर जणू एका जबरदस्त आस्था आणि शिस्तीत जपलेलं आहे.
चित्रपटात झळकणारा जॉन केवळ अभिनयासाठी ओळखला जात नाही, तर त्याच्या संपत्तीच्या व्यवस्थापनासाठीही नावाजला जातो. आज तो 251 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे आणि ‘जेए एंटरटेनमेंट’च्या माध्यमातून ‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’सारखे दर्जेदार चित्रपटही त्याने बनवले आहेत.