अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाचं स्वतःचं वैशिष्ट्य असतं. पण काही अंक असे असतात जे इतरांपेक्षा वेगळे आणि थोडे ‘धोकादायक’ मानले जातात अर्थात, त्यांच्या हट्टी स्वभावामुळे आणि गुप्त योजना आखण्याच्या शक्तीमुळे. अशाच विशेष गटात येतो अंक 4.

ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 बनतो. या अंकावर अधिपत्य असतो राहू ग्रहाचा. राहू रहस्यमय, चाणाक्ष आणि अनेक वेळा धोकादायक पद्धतीने बुद्धिमान मानला जातो. त्यामुळे या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात देखील तीच लक्षणं दिसून येतात.
मूलांक 4
अंक 4 चे लोक दिसायला शांत वाटले तरी त्यांचे मन कायम काहीतरी मोठं, हटके आणि आश्चर्यचकित करण्याच्या तयारीत असतं. त्यांना कोणी फसवू शकत नाही, उलट ते स्वतः इतरांना आधीच ओळखून योग्य डाव खेळतात. म्हणूनच त्यांच्याशी व्यवहार करताना अनेकदा लोक सावध राहतात.
हे लोक श्रीमंतीसाठीच जन्मलेले असतात, असं म्हटलं तरी चालेल. त्यांना पैशाचं भान, त्यात गुंतवणूक, डावपेच, आणि फायदा कसा मिळवायचा याचं उत्तम ज्ञान असतं. ते एखादी कल्पना इतकी काळजीपूर्वक फुलवतात की ती एक दिवस कोटींच्या, अगदी अब्जो-ट्रिलियन रुपयांच्या डीलमध्ये रुपांतरित होते.
प्रेमात निष्ठावान, पण…
या लोकांचं प्रेम जीवन काहीसं गुंतागुंतीचं असतं. ते प्रेमात लाजाळू असले तरी एकदा एखाद्याशी बांधले गेले, की पूर्ण समर्पित राहतात. पण कामात इतके व्यग्र होतात की नात्यांना वेळ देणं कमी होतं. त्यांचा स्वभाव हट्टी असल्यामुळे भांडणंही होतात. त्यांच्यासाठी योग्य जोडीदार म्हणजे जो त्यांचा स्वतंत्र विचार आणि जगण्याची पद्धत समजून घेईल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवेल.
विशेष उपाय
निळा आणि हिरवा रंग यश आणि स्थैर्य देतो. गोमेद रत्न राहूशी संबंधित असून अडचणी टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो. बुधवार आणि शनिवार हे दिवस त्यांच्यासाठी विशेष फलदायी मानले जातात. या मूलांकच्या व्यक्तींनी बुधवारी कुत्र्यांना ब्रेड व दूध द्यावे. तसेच ‘ॐ रां राहवे नमः’ या मंत्राचा जप केल्याने राहूची प्रतिकूलता कमी होते.