एका मिसाइलची किंमत 5.38 अब्ज रुपये?, वाचा जगातील सर्वात महागड्या शस्त्रांची यादी!

Published on -

जगभरातील देश आपली सुरक्षा भक्कम ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करत असतात. यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रं विकत घेतली जातात, जी फक्त प्राणघातकच नसतात, तर त्यांची किंमत देखील इतकी मोठी असते की ती ऐकून कुणाच्याही डोळ्यांत पाणी येईल आणि पाय लटपटू लागतील. जगातील काही शस्त्रं तर इतकी महागडी आहेत की त्यांची किंमत संपूर्ण शहराच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. या महागड्या शस्त्रांमध्ये जेवढी तांत्रिक प्रगती आहे, तेवढाच राजकीय आणि आर्थिक दबदाही दडलेला आहे.

‘ट्रायडंट’

या यादीत सर्वात वर आहे ‘ट्रायडंट’ एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे अमेरिकेने खास आपलं अणुशक्तीचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी तयार केलं आहे. लॉकहीड मार्टिनसारख्या दिग्गज कंपनीने बनवलेलं हे क्षेपणास्त्र अमेरिका आणि युकेच्या नौदलात वापरलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे समुद्रातून उडून थेट शत्रूच्या हृदयावर घाव करू शकतं. पण जेव्हा तुम्हाला कळेल की याची किंमत तब्बल 5.38 अब्ज रुपये आहे, तेव्हा क्षणभर तुम्हीही स्तब्ध व्हाल. एकटं हेच शस्त्र अनेक छोट्या देशांच्या संरक्षण बजेटला गारद करू शकतं.

GBU-43/B

दुसऱ्या क्रमांकावर आहे एक असं शस्त्र, ज्याचं नावच थरकाप उडवतं ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’, म्हणजेच MOAB. अधिकृत नाव GBU-43/B. हे अणुबॉम्ब नाही, पण त्याच्या शक्तीपुढे एखादं छोटं गाव उध्वस्त होऊ शकतं.

अमेरिकेच्या ताफ्यात असलेला हा बॉम्ब एका झटक्यात भक्कम बंकरही पिसासारखा उडवू शकतो. जरी त्याची नेमकी किंमत जाहीर केलेली नाही, तरी संरक्षण तज्ज्ञांच्या मते ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. हे शस्त्र वापरणं म्हणजे युद्धाची दिशा एकाच क्षणात उलटवणं.

APKWS शस्त्र

तिसऱ्या स्थानावर आहे थोडंसं छोटं पण तितकंच खास शस्त्र अ‍ॅडव्हान्स्ड प्रिसिजन किल वेपन्स सिस्टम, म्हणजेच APKWS. लेसर गाईडेड असलेली ही क्षेपणास्त्र प्रणाली विशेषतः अचूकतेसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे, ही पारंपरिक रॉकेट लाँचरवरूनही वापरता येते आणि तिची किंमत एक युनिटसाठी सुमारे 23 लाख रुपये आहे. ती हलक्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनवरही सहज बसवता येते, त्यामुळे आधुनिक लढाईसाठी ती फार उपयुक्त ठरते.

‘स्टिंगर’

चौथ्या क्रमांकावर आहे ‘स्टिंगर’ हे एक मानवद्वारे उचलता येणारं क्षेपणास्त्र आहे, ज्याचा वापर जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी होतो. हेलिकॉप्टर, ड्रोन किंवा कमी उंचीवरून उडणारी लढाऊ विमाने यांना पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र उपयोगी ठरतं. याची अचूकता इतकी प्रखर आहे की युद्धाच्या मैदानात याला सोबत घेणं म्हणजे स्वतःसोबत एक विश्वासार्ह संरक्षण घेणं.

असॉल्ट रायफल SIG 716

पाचव्या क्रमांकावर आहे एक आधुनिक आणि वेगवान असॉल्ट रायफल SIG 716. अमेरिका आणि स्वित्झर्लंडच्या लष्करी कंपनीने बनवलेली ही रायफल अलीकडेच भारतीय सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. ती विशेषतः क्लोज-क्वार्टर बॅटलसाठी वापरली जाते आणि तिची मारक शक्ती इतकी प्रभावी आहे की एकाच झटक्यात शत्रूला निष्प्रभ करता येतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!