लाखो नाही कोटींमध्ये मिळते ‘रोलेक्स’ घड्याळ, असं काय खास असतं या घड्याळमध्ये? जाणून घ्या रोलेक्सची वैशिष्ट्ये!

Published on -

रोलेक्स ही घडयाळ कायम मोठ-मोठे सेलेब्रिटी, खेळाडू आणि उद्योगपती यांच्या हातातच दिसून येते. कारण, तिची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच आहे. अनेकांना वाटतं की इतकं छोटं घड्याळ लाखो रुपयांना का विकलं जातं, पण त्यामागचं शास्त्र, मेहनत आणि इतिहास समजला की प्रत्येक पैशाची किंमत जाणवते.

रोलेक्स घडयाळ

रोलेक्स म्हणजे केवळ एक ब्रँड नाही, तर एक अनुभव आहे. जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट घड्याळांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. यामागचं मुख्य कारण म्हणजे याच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये घेतली जाणारी काळजी. या कंपनीकडे स्वतःचा संशोधन विभाग आहे, जिथे शास्त्रज्ञ आणि अभियंते सातत्याने नवीन धातू, टिकाऊपणा आणि अचूकतेवर संशोधन करत असतात.

फक्त बाहेरून आकर्षक दिसावं यासाठीच नाही, तर हे घड्याळ कितीही कठीण हवामानात, उंच डोंगरांवर किंवा खोल समुद्रातही अचूक वेळ दाखवतं, यासाठी हे घड्याळ विविध कसोट्यांवर तपासलं जातं.

या तपासण्या कुठल्याही सामान्य प्रयोगशाळेत होत नाहीत. एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते उष्ण वाळवंटांपर्यंत, आणि अगदी खोल समुद्रातल्या दडपणाखालीही हे घड्याळ अगदी अचूकपणे काम करतं का, याची खात्री केली जाते. त्यामुळं या घड्याळाला फक्त फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणून बघणं अन्यायकारक ठरेल.

‘अशी’ बनते रोलेक्स घडयाळ

रोलेक्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूही तितक्याच खास असतात. सामान्य स्टील नव्हे, तर स्पेशल मिश्रधातू, प्लॅटिनम आणि खास प्रक्रिया केलेलं सोने वापरलं जातं. इतकंच नव्हे, तर त्या सोन्यावर विशेष प्रक्रिया केली जाते, जेणेकरून घड्याळ अनेक वर्षं टिकावं आणि त्याचं तेज कमी होऊ नये. यामधील अनेक भाग मशीनमध्ये तयार होतात, पण अंतिम तपासणी आणि फिनिशिंग मनुष्याच्या हातूनच केली जाते, कारण काही गोष्टी अनुभवावरच समजतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe