तब्बल 350 कोटींचा खर्च! महाराष्ट्रात उभारलं जातंय देशातील दुसरं खासगी रेल्वे स्टेशन, पाहा काय सुविधा मिळणार ?

Published on -

भारतातील रेल्वे प्रवासाच्या अनुभवात लवकरच एक नविन अध्याय जोडला जाणार आहे. मध्य भारतात, महाराष्ट्रातील नागपूरजवळ असलेल्या अजनी रेल्वे स्थानकाचे पुर्नविकासाचे काम सध्या जोमात सुरू असून, हे भारतातील दुसरे खासगी रेल्वे स्टेशन ठरणार आहे. पहिल्या खाजगी स्टेशन राणी कमलापतीच्या यशानंतर, अजून अधिक प्रगत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे हे स्टेशन भविष्यातील रेल्वे सुविधांचं उत्तम उदाहरण ठरण्याची अपेक्षा आहे.

अजनी रेल्वे स्थानक

अजनी या स्थानकाचा पुर्नविकास प्रकल्प फक्त रेल्वे प्रवाशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. केवळ 4 महिन्यांत हे संपूर्ण स्टेशन नव्याने साकारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे 359.82 कोटी रुपये इतका खर्च केला जात आहे.

या नव्या डिझाइनमध्ये ग्रीन बिल्डिंगची संकल्पना केंद्रस्थानी असून, दिव्यांग प्रवाशांसाठी खास सुविधा देण्यात येणार आहेत. ही एक अशी जागा असेल जिथे आधुनिकता आणि सोयी-सुविधा यांचा उत्कृष्ट मेळ पाहायला मिळेल.

या प्रकल्पाची पायाभरणी 11 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती आणि त्यानंतर कामाला वेग आला आहे. स्टेशनमध्ये 10 मीटर रुंदीचे दोन फूट ओव्हर ब्रिज बांधले जात आहेत आणि पश्चिम बाजूला 3,679 चौरस मीटर क्षेत्रफळावर पार्किंगची सोय देखील केली जात आहे. जेव्हा हे स्टेशन पूर्णत्वास जाईल, तेव्हा हे केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर नागपूर शहराच्या वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीनेही एक मोठा टप्पा ठरेल.

स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

सध्या या स्टेशनचं बांधकाम जवळपास पूर्ण होण्याच्या टप्प्यात असून, अंतिम टप्प्यातील काम अत्यंत जलदगतीने सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, पुनर्विकासाच्या काळात प्रवाशांना कोणताही अडथळा होऊ नये म्हणून तात्पुरते स्टेशन उभारण्यात आले आहे. या प्रकल्पात दाखवलेली जागरुकता आणि नियोजन पाहता, हे स्टेशन प्रवाशांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल, अशीच सर्वांना आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!