वास्तुशास्त्रानुसार ‘या’ चुका टाळाच; अन्यथा करिअर, पैसा आणि प्रेमात कशातच यश मिळणार नाही!

घरात नकारात्मकता आणि अडचणी येण्यामागे आपल्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. या चुका टाळल्या तर प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. वास्तुशास्त्र हे फक्त घर बांधण्याचे शास्त्र नाही, तर ते आपल्या दैनंदिन सवयींशीही जोडलेले आहे.

आपण घरामध्ये नकळत अशा काही गोष्टी करतो, ज्या वास्तुदोष निर्माण करून आयुष्यात अडचणी निर्माण करतात. आर्थिक संकट, करिअरमध्ये प्रगतीचा अभाव, मानसिक अशांती यामागे आपल्या रोजच्या सवयी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या वास्तुनुसार टाळल्या पाहिजेत.

तुटलेली भांडी

घरात तुटलेली भांडी ठेवणे किंवा त्यात अन्न खाणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि गरिबी येण्याची शक्यता निर्माण होते. अशा वस्तू शक्य तितक्या लवकर घराबाहेर काढाव्यात.

सुक्या पानांचे तोरण

घराच्या दरवाज्यावर सुकलेली फुलं किंवा पाने असलेले तोरण लावल्यास ते नकारात्मक ऊर्जा खेचते. त्यामुळे लक्ष्मीचा वास घरात टिकत नाही आणि आर्थिक प्रगती थांबते. त्यामुळे नियमितपणे तोरण बदलणे आवश्यक आहे.

लोखंडी खिळे

घराच्या भिंतींवर खिळे लावून ठेवलेले असतात, पण अनेकदा त्यांचा काही उपयोग नसतो. अशा खिळ्यांमुळे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक कंपनं तयार होतात आणि त्या आरोग्य व आर्थिक अडचणी निर्माण करतात.

कोळीचे जाळे

घरात कोळीचे जाळे दिसले तर ते कामात अडथळे आणण्याचे लक्षण मानले जाते. हे जाळे राहू किंवा शनि दोषाचे संकेत असू शकतात. त्यामुळे नियमित साफसफाई करून घर नेहमी स्वच्छ ठेवावे.

तसेच शौचालयात मोबाईल घेऊन जाणे ही सवय फार सामान्य झाली आहे, पण वास्तुशास्त्रानुसार हे बुध आणि राहू ग्रहांच्या दोषांना वाढवते. त्यामुळे मानसिक तणाव, कामात अडथळे व विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो.