वास्तुनुसार ‘या’ 6 गोष्टी कोणासोबतही शेअर करू नये, नशीबावर होतो वाईट परिणाम!

Published on -

वास्तुशास्त्र हे केवळ घराच्या रचनेसाठी नसून आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी सुद्धा त्याचा खोल संबंध असतो. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, आपली वैयक्तिक जागा आणि वस्तूंशी जोडलेली ऊर्जा आपल्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पाडू शकते. अनेकवेळा आपल्याला वाटते की जवळच्या नात्यांमध्ये सगळं काही शेअर करावं, परंतु वास्तुशास्त्र सांगतं काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त तुमच्यापुरत्याच मर्यादित असाव्यात. अन्यथा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अडथळे, मानसिक अशांती किंवा नशिबातील उलथापालथ घेऊन येऊ शकतात.

टॉवेल

टॉवेल ही केवळ स्वच्छतेची बाब नसून, तुमच्या शरीराची ऊर्जा त्यात शोषली जाते, असं वास्तुशास्त्र मानतं. त्यामुळे कोणीही तुमचं टॉवेल वापरत असेल तर त्यांच्या उर्जेचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्यावर होतो. त्यामुळे स्वतःचा टॉवेल कोणाशीही शेअर करू नये.

वैयक्तिक बाथरूम

तुमच्या वैयक्तिक बाथरूममध्ये असणाऱ्या वस्तूंपासून तुमची खास जागा तयार होते. पाहुण्यांना बाथरूम शेअर करताना वाटणारी सहजता तुमच्या उर्जेवर घाला घालू शकते. शक्य असल्यास, पाहुण्यांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था ठेवा.

ऑफिसमधली खुर्ची

तुम्ही ज्या खुर्चीत दररोज बसता, ती तुमच्या मनःस्थितीशी जोडलेली असते. दुसऱ्याने ती खुर्ची वापरल्यास, त्यांच्या उर्जेचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. ही बदललेली उर्जा तुमचं काम, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास यावर प्रतिकूल परिणाम करू शकते.

कपडे

वास्तुशास्त्रानुसार, विशेष प्रसंगी परिधान केलेले कपडे जसे की साडी, लेहेंगा किंवा सूट, हे तुमच्या आठवणी आणि उर्जेने भारलेले असतात. हे कपडे दुसऱ्याला वापरू दिल्यास तुमच्या आयुष्यात नव्या समस्या उद्भवू शकतात. खास करून तुमच्या लग्नातील कपडे कुणालाच देऊ नयेत.

चहा किंवा कॉफीचा मग

तुमचा आवडता मग तुमच्या दैनंदिन आनंदाशी, सवयीशी आणि उर्जेशी जोडलेला असतो. त्यामध्ये इतरांनी प्यायल्यास तुमची ती सत्त्वशुद्ध उर्जा भंग पावते. त्यामुळे वैयक्तिक मग फक्त स्वतःसाठीच वापरणे चांगले.

वैयक्तिक बेड

तुमचा बेड ही केवळ झोपेसाठीची जागा नाही, तर तुमच्या शरीर, मन आणि आत्म्याची ऊर्जा तिथे साठलेली असते. दुसऱ्याने त्या बेडवर झोपल्यास तुमच्या विश्रांतीची क्षमता कमी होते आणि काही वेळेस त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावरही होतो, असं वास्तुशास्त्र सूचित करतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!