अभिनेत्री आलिया भट्टने सांगितलं तिचं ब्युटी सिक्रेट, महगड्या क्रिम नव्हे तर ‘हा’ नैसर्गिक उपाय तुम्हालाही देऊ शकतो सुंदर आणि चमकदार त्वचा!

Published on -

आई झाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. हेच काहीसं अभिनेत्री आलिया भट्टच्या बाबतीतही घडलं. ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिच्या ग्लास स्कीनसाठी प्रसिद्ध असलेली आलिया, आता तिच्या सौंदर्याच्या काळजीत अधिक सजग झाली आहे.

अलीकडेच तिने तिच्या चमकदार त्वचेच्या रहस्याबद्दल एक खास गोष्ट शेअर केली, जी अनेक महिलांना प्रेरणादायी वाटू शकते.पूर्वी आलिया भट्ट दिवसाची सुरुवात कॅफिनसह करायची.

पण आई झाल्यानंतर तिच्या शरीराने वेगळी गरज जाणवायला सुरुवात केली. आता तिचं लक्ष केवळ बाह्य सौंदर्यावर नाही, तर आंतरिक आरोग्यावरही आहे. याच प्रवासात आलियाला सापडला एक असा नैसर्गिक उपाय, ज्यामुळे तिच्या त्वचेला आतून आरोग्यदायी चमक मिळाली आणि तो आहे बीटरूट ज्यूस.

 

आलिया भट्टचे ब्युटी सिक्रेट

हा रस फक्त बीटचा नाही, तर त्यात सफरचंदाचा रस, संत्र्याचा ताजेपणा, सेलेरीची हलकीशी झणझणीत चव आणि आलेचा उग्रपणा मिसळलेला असतो. या सगळ्यांचं एकत्र मिश्रण केल्यावर तयार होतो एक उर्जादायी, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय जे फक्त त्वचेसाठी नाही, तर शरीरासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे.

आलिया सांगते की, हा ज्यूस पिल्यानंतर तिला दिवसभरासाठी उर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. शरीरात ताजेपणा राहतो आणि त्वचा अधिक तेजस्वी वाटते. आरशात स्वतःकडे पाहिल्यावर जी नैसर्गिक चमक जाणवते, ती कोणत्याही महागड्या स्किनकेअर प्रोडक्ट्सपेक्षा वेगळी आणि खरी असते.

बीटरूटमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा निखार वाढतो, रक्तशुद्धी होते आणि शरीराचे पचनसंस्थेपासून ते यकृतापर्यंत अनेक भाग सुधारतात. त्यात फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारते, हाडं मजबूत होतात आणि तणावही कमी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!