मोहम्मद सिराजनंतर ‘या’ क्रिकेटपटूलाही मिळाली सरकारी नोकरी! यूपी सरकारकडून 7 खेळाडूंना अधिकारी पदाची भेट, पाहा यादी

Published on -

उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी मोठी आणि सन्मानाची बातमी समोर आली आहे. केवळ भारतीय संघात धमाकेदार कामगिरी करणारा रिंकू सिंगच नव्हे, तर विविध खेळांमध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या अन्य 6 खेळाडूंनाही योग्यता ओळखून उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

रिंकू सिंग बनला शिक्षण अधिकारी

या निर्णयाअंतर्गत रिंकू सिंगची जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. अलीगडमध्ये जन्मलेला आणि IPL मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला रिंकू सिंग आपल्या फिनिशिंग कौशल्यामुळे ओळखला जातो.

त्याच्या खेळातील जिद्द आणि सातत्य यामुळे राज्य सरकारने त्याला अधिकृत मान्यता देत, शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा सुरू आहे. त्याचा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबतचा विवाह फेब्रुवारी 2026 मध्ये ठरलेला आहे.

प्रवीण कुमार

या यादीत आणखी एक झळाळता चेहरा म्हणजे प्रवीण कुमार. मेरठमध्ये जन्मलेला हा पॅरा हाय जंपपटू टोकियो पॅरालिंपिकमधील रौप्य आणि पॅरिस पॅरालिंपिकमधील सुवर्ण विजेता आहे. त्याला डीएसपी पदावर नियुक्त करून सरकारने त्याच्या कामगिरीचा गौरव केला आहे.

राजकुमार पाल

हॉकीच्या मैदानावर भारतासाठी खेळणारा गाझीपूरचा राजकुमार पाल हाही आता डीएसपी पदावर नियुक्त होणार आहे. तर, अपंगत्व असूनही जिद्दीने भालाफेक खेळात चमक दाखवणारे अजित सिंह यादव आणि दृष्टिहीन असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा अॅथलेटिक्समध्ये नावलौकिक मिळवणारी सिमरन, या दोघांनाही पंचायती राज विभागात जिल्हा अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

प्रीती पाल व किरण बलियान

या सोबतच, 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतींमध्ये देशासाठी पदके जिंकणारी प्रीती पाल हिला ग्रामीण विकास विभागात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बनवण्यात येणार आहे.

आणि शॉर्ट पुटमध्ये चमकदार कामगिरी करणारी आणि बलिया जिल्ह्याची किरण बलियान वन विभागात प्रादेशिक वन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!