लोन क्लोज झाल्यानंतर बँकेला सर्वप्रथम ‘या’ गोष्टीबाबत विचारा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात मोठ्या अडचणी!

Published on -

बँक कर्ज घेताना आपल्याला असंख्य कागदपत्रे सादर करावी लागतात. पण जेव्हा आपण पूर्ण कर्ज फेडतो, तेव्हा बहुतेकजण समजतात की काम संपलं. पण प्रत्यक्षात कर्ज पूर्ण केल्यानंतर काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं बँकेकडून घेणं आवश्यक असतं. अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणी, मालमत्तेवरील दावा अथवा क्रेडिट स्कोअरशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात.

ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

एनओसी म्हणजे बँकेकडून मिळणारे असे पत्र जे स्पष्ट सांगते की कर्जदाराने संपूर्ण रक्कम परत केली आहे आणि आता बँकेकडे कोणतीही देयक शिल्लक नाही. हे प्रमाणपत्र तुमच्यासाठी भविष्यात कोणत्याही आर्थिक वादात ‘शील्ड’सारखं काम करतं.

व्यवहार पूर्ण झाल्याचं खात्रीपत्र

NOC व्यतिरिक्त, बँकेकडून ‘Loan Closure Letter’ घेणेही महत्त्वाचे आहे. हे पत्र बँकेच्या रेकॉर्ड्समध्ये तुमचे खाते अधिकृतरीत्या बंद झाले आहे हे दर्शवते.

अंतिम परतफेड विवरणपत्र

कर्जाच्या अखेरच्या व्यवहाराचा तपशील असलेले हे विवरणपत्र तुम्ही भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी किंवा कोणत्याही चुकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरू शकता. यामध्ये तुम्ही कर्जाचे EMI कधी आणि किती भरले, याबाबत माहिती असते.

 

जर तुम्ही कर्जाच्या बदल्यात घर, कार, एफडी किंवा इतर कोणतीही संपत्ती गहाण ठेवली असेल, तर ती सुटल्याचे आणि पुन्हा तुमच्या नावावर झाल्याचे अधिकृत कागदपत्र बँकेकडून घ्या. हे विसरल्यास, त्या मालमत्तेवर तुमचा हक्क धोक्यात येऊ शकतो.

मूळ कर्ज करार

यानंतर तुम्ही कर्ज घेताना जी करारपत्रे बँकेला दिली होती, ती परत मिळवा. हे कागद भविष्यात काही चौकशी अथवा कायदेशीर प्रक्रियेत उपयोगी पडू शकतात.तसेच कर्ज बंद झाल्यावर बँकेने ही माहिती क्रेडिट ब्युरो (CIBIL) ला दिली आहे की नाही याची खात्री करा. कारण कर्ज फिटूनही जर तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा झाली नाही, तर ते भविष्यातील कर्ज प्रक्रियेसाठी अडचणीचे ठरू शकते. तसेच कोणतेही उर्वरित शुल्क, दंड किंवा लपलेले शुल्क असल्यास त्याचीही माहिती करून घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!