दारू, तंबाखू, गुटखा…सर्व व्यसनांवर हमखास उपाय! देसी वैद्यांचा 100% प्रभावी फॉर्म्युला वापरुन पाहाच

Published on -

व्यसन म्हणजे एक अशी साखळी आहे जी शरीरच नव्हे तर मनालाही घट्टपणे बांधून टाकते. कित्येकदा माणूस स्वतःहूनही या व्यसनाच्या जाळ्यात अडकतो, आणि बाहेर पडायचा अनेकदा प्रयत्न करत असतानाही त्याला यश येत नाही. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्स हे सर्व एकदा अंगवळणी पडले की त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी फक्त औषध नव्हे, तर मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. अशात राजस्थानचे सुप्रसिद्ध वैद्य जगदीश सुमन यांनी सांगितलेला एक फॉर्म्युला चांगलाच चर्चेत आलाय.

जगदीश सुमन यांनी अशी एक खास देसी रेसिपी सांगितली आहे, जी त्यांच्या म्हणण्यानुसार, अगदी पक्क्या व्यसनी व्यक्तीलासुद्धा व्यसनमुक्त करू शकते. या उपचारात कोणतंही महागडं औषध नाही, ना कोणी डॉक्टरची फी फक्त घराजवळच्या किराणा दुकानात सहज मिळणाऱ्या 3 गोष्टींचा वापर आहे. आणि विशेष म्हणजे, हे औषध तयार करणंही फार सोपं आहे.

औषधीसाठी लागणारे साहित्य

या घरगुती औषधात मुख्यतः अश्वगंधा, शुद्ध कुचला आणि कापूरचा रस यांचा वापर होतो. अश्वगंधा शरीराच्या तणावावर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर काम करणारा आयुर्वेदीक घटक. कुचला नियंत्रित प्रमाणात घेतल्यास इच्छाशक्ती वाढवणारा आणि व्यसनांकडे ओढ कमी करणारा एक उग्र औषधी घटक. तर कापूरचा रस शरीरात एकप्रकारची थंडी आणि स्थैर्य देतो.

‘असं’ बनवा औषध

हे औषध तयार करताना 100 ग्रॅम अश्वगंधा पावडरमध्ये 1 चमचा शुद्ध कुचला मिसळायचा आणि त्यात 5 ग्रॅम कापूरचा रस टाकायचा. हे सर्व मिक्स करून बारीक पावडर तयार करायची आणि कोरड्या डब्यात जतन करायचं. जेव्हा केव्हा तुम्हाला व्यसन करायची तीव्र इच्छा जाणवेल, त्याआधी सुमारे 15 मिनिटं आधी या मिश्रणाचा 1 चमचा घेतला की शरीरात आणि मनात त्या व्यसनाकडे ओढ निर्माण होणार नाही.

मात्र, यासाठी केवळ औषध घेतलं की झालं, एवढं पुरेसं नाही. स्वतःवर विश्वास ठेवणं, हळूहळू स्वतःच्या सवयी बदलणं आणि आपल्याला खरंच यातून बाहेर पडायचंय याची जाणीव ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. वैद्य सुमन यांनी सांगितलेला फॉर्म्युला म्हणजे हजारो लोकांनी वापरून पाहिलेला मार्ग आहे, जो त्यांच्या मते परिणामकारक ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!