भरपूर फायदे असले तरी प्रमाण आवश्यक, रोज किती अंडी खाणे फायदेशीर? जाणून घ्या डॉक्टरांचं मत!

Published on -

आपल्या रोजच्या आहारात अंड्यांना एक विशेष स्थान आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असलेले अंडे अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. पण या फायद्यांचा संपूर्ण लाभ अनेकांना मिळत नाही, कारण अंडी खाण्याची पद्धत चुकीची वापरली जाते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणद्रव्यांचा उपयोग होत नाही आणि आरोग्यावर परिणाम होतो. अलीकडील संशोधनांनी याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

अंडी खाण्याचे फायदे

एका अभ्यासात सांगितले गेले की, जर एखादी व्यक्ती दररोज 1.5 अंडी खाते, तर तिची हाडे इतरांपेक्षा 70 ते 80 टक्के अधिक मजबूत असतात. कारण एका मोठ्या अंड्यात सुमारे 6-7 ग्रॅम शुद्ध प्रथिनं असतात. यासोबतच त्यात जीवनसत्त्वे A, D, E, B12, कोलीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखी खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः अंड्याचा पिवळा भाग मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मेंदूची तीव्रता आणि डोळ्यांची दृष्टी टिकवण्यासाठी अंड्यांमधील कोलीन आणि ल्युटीन खूप उपयोगी ठरतात. मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल उपकरणांच्या प्रकाशातून डोळ्यांना होणारे नुकसान हे अंड्यातील पोषक घटक टाळू शकतात. कोलीन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये मेंदूला सक्रिय ठेवण्याचे काम करते.

अंड्यांचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वजन कमी करण्यासही मदत करते. अंडे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते. एकेकाळी असं मानलं जायचं की अंडी कोलेस्ट्रॉल वाढवतात, पण आता सिद्ध झालं आहे की संतुलित प्रमाणात अंडी खाल्ल्याने हृदयावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

किती अंडी खावीत?

तर प्रश्न असा येतो की, नेमकी किती अंडी खावीत? निरोगी व्यक्तीने रोज 1 ते 2 अंडी खाणे योग्य ठरते. वजन कमी करायचं असेल तर सकाळच्या नाश्त्यात उकडलेले 1 ते 2 अंडी उपयुक्त ठरतात. वयस्क व्यक्तींसाठी दररोज एक अंडे पुरेसे मानले जाते. मात्र ज्यांना हृदयविकाराची तक्रार आहे, त्यांनी अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, विशेषतः पिवळा बलक टाळावा.

अंड्यांचे पोषण पूर्ण मिळवायचे असेल तर ते योग्य पद्धतीने, योग्य वेळेस आणि संतुलित प्रमाणात खाणे आवश्यक आहे. अन्यथा हे सुपरफूडदेखील अपुरेच राहू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!