Jio वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही असे प्लॅन्स सादर केले आहेत जे केवळ कॉलिंग किंवा डेटापर्यंत मर्यादित नाहीत तर तुम्हाला नेटफ्लिक्स, Amazon Prime Video Lite, JioCinema, आणि JioTV यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा विनामूल्य अॅक्सेस देखील मिळतो. विशेष म्हणजे हे प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहेत जे दररोज मनोरंजन, वेब सिरीज आणि लाईव्ह मॅचेस पाहण्यासाठी डेटा आणि सबस्क्रिप्शन एकत्रित शोधतात.

₹100 चा प्लॅन
सुरुवात करूया सर्वात किफायतशीर पर्यायांपासून. जिओचा ₹100 चा प्लॅन फक्त डेटा पॅक असला तरी यामध्ये 90 दिवसांची वैधता आणि 5GB डेटा दिला जातो. विशेष म्हणजे, यात तुम्हाला JioCinema चा मोफत अॅक्सेस मिळतो, म्हणजे टीव्ही शोज आणि क्रिकेट लाइव्ह पाहता येईल.
₹195 चा प्लॅन
थोडं पुढे गेलं तर ₹195 चा प्लॅन येतो, ज्यामध्ये 90 दिवसांसाठी 15GB डेटा आणि Hotstarचा अॅक्सेस दिला जातो. म्हणजेच तीन महिन्यांच्या एंटरटेनमेंटची सोय कमी खर्चात!
₹949 चा प्लॅन
₹949 चा प्लॅन थोडा जास्त फीचर्स घेऊन येतो. 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि JioTV व Hotstar यांचा विनामूल्य वापर. सतत वेब सिरीज पाहणाऱ्यांसाठी हा प्लॅन योग्य आहे.
₹1029 चा प्लॅन
₹1029 चा प्लॅन हेच फायदे जास्त सबस्क्रिप्शनसह देतो. यात Amazon Prime Video Lite आणि JioTV मिळते. याचीही वैधता 84 दिवसांचीच आहे.
जे वापरकर्ते Netflix वर मोबाइलवर कंटेंट पाहतात, त्यांच्यासाठी ₹1299 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. यामध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 100 मोफत SMS आणि Netflix (मोबाइल) व JioTV चा अॅक्सेस आहे.
₹1799 चा प्लॅन
सर्वात मोठा आणि आकर्षक प्लॅन म्हणजे ₹1799 चा. यात 84 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 100 मोफत SMS आणि Netflix (बेसिक) व JioTV मिळतो. म्हणजेच, मोबाइल किंवा स्मार्ट टीव्हीवर तुम्ही नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन सहज वापरू शकता.