‘या’ 5 युरोपीय देशांमध्ये अमेरिकेने लपवली आहेत अण्वस्त्रे, एका क्लिकवर होऊ शकतो महास्फोट! गुप्त यादी उघड

Published on -

जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिकेचे नाव घेतले जाते, आणि त्यामागचं कारण केवळ तिची आर्थिक किंवा तांत्रिक प्रगती नाही, तर तिच्या अण्वस्त्र सामर्थ्यातही दडलेलं आहे. अमेरिकेकडे सध्या अंदाजे 5,200 अण्वस्त्रे असल्याचं सांगितलं जातं. पण ही सगळी शस्त्रे अमेरिकेच्या भूमीवर नाहीत. त्यापैकी अनेक शस्त्रे जगाच्या विविध कोपऱ्यांत, इतर देशांच्या भूमीत गुप्तपणे तैनात करण्यात आली आहेत. आता याच गुप्त तैनातीबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती बाहेर आली असून, यामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजू शकते.

अण्वस्त्रांचा धोका

अण्वस्त्र हा शब्दच मुळात जगाला भयभीत करतो. विशेषतः जेव्हा दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण असतं, तेव्हा या शस्त्रांचा उल्लेख अधिक तीव्रतेनं केला जातो. अलीकडील भारत-पाकिस्तान वाद असो किंवा इराण-इस्रायलमध्ये निर्माण झालेला तणाव अशा सगळ्या संघर्षांमध्ये अण्वस्त्रांचा धोका एक सावलीसारखा उपस्थित असतो. आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इतर देशांमध्ये अण्वस्त्रं तैनात करून ठेवलेली असणं ही एक चिंतेची बाब ठरते.

अशावेळी प्रश्न असा निर्माण होतो की, अमेरिका आपल्या शस्त्रांना परदेशात का ठेवते? याचं उत्तर तितकंच स्पष्ट आहे, सुरक्षा आणि धोरणात्मक नियंत्रण. हे शस्त्रं इतर देशांमध्ये लपवणं म्हणजे एका अर्थाने “फॉरवर्ड बेस” तयार करणं. म्हणजेच, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर त्या भागातून थेट आणि तत्काळ प्रतिसाद देता येईल. हे पाऊल फक्त शक्तीचं प्रदर्शन नाही, तर भविष्यातील संभाव्य धोक्यांचा वेळीच सामना करण्यासाठी रचलेली एक पूर्वतयारी आहे.

‘या’ देशात अमेरिकेने लपवली अण्वस्त्र

अशा देशांमध्ये ही शस्त्रं ठेवली जातात ज्यांना “अण्वस्त्रधारी देश” म्हटलं जातं, पण त्या देशांना या शस्त्रांवर कोणतेही नियंत्रण किंवा वापराचा अधिकार नसतो. हे संपूर्ण अधिकार अमेरिकेकडेच असतात. म्हणजेच, उदाहरणार्थ जर जर्मनी किंवा बेल्जियममध्ये अशी अण्वस्त्रं ठेवलेली असतील, तरी ती त्या देशांच्या हातात नसतात, त्यांच्या वापराचा निर्णय फक्त वॉशिंग्टनमध्ये घेतला जातो.

संशोधन संस्था आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका सध्या ज्या देशांमध्ये अण्वस्त्रं तैनात करून ठेवते, त्यात जर्मनी, नेदरलँड्स, इटली, बेल्जियम आणि तुर्की यांचा समावेश आहे. ही तैनाती नाटोच्या अण्वस्त्र सामायिकरण धोरणाअंतर्गत केली जाते. यामुळे NATO सदस्य देशांना सामूहिक संरक्षणाची हमी मिळते, पण याचवेळी ते जागतिक असंतुलनाचं कारणही बनू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!