तुम्हीही ChatGPT वापरताय? मग हे 5 प्रश्न कधीही विचारू नका, अन्यथा होऊ शकते कायदेशीर कारवाई!

Published on -

आजच्या डिजिटल युगात ChatGPT सारखे एआय चॅटबॉट्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. काही सेकंदांत माहिती मिळवण्यापासून ते लेख लिहिण्यापर्यंत, अनेक जण याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत आहेत. पण या सोयीमुळे काही धोकेही आहेत, जे आपण दुर्लक्षित केल्यास मोठ्या अडचणीत सापडू शकतो. काही प्रश्न असे असतात, जे ChatGPT ला विचारणे केवळ चुकीचे नाही, तर कायदेशीर आणि वैयक्तिक पातळीवरही धोकादायक ठरू शकते. चला तर पाहूया, कोणते आहेत हे 5 प्रश्न जे तुम्ही कधीच ChatGPT ला विचारू नयेत.

वैयक्तिक माहितीबाबतचे प्रश्न

सर्वात पहिलं आणि गंभीर म्हणजे वैयक्तिक माहितीबाबतचे प्रश्न. अनेकदा काही वापरकर्ते आधार कार्ड, पॅन नंबर, बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा इतर संवेदनशील माहिती ChatGPT कडे विचारतात. हे केवळ अयोग्यच नाही, तर तुमच्या सुरक्षेसाठी खूप मोठा धोका ठरू शकतो. एआय प्लॅटफॉर्म्स तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण ही माहिती सार्वजनिक झाली तर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हॅकिंगसारखे प्रश्न

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हॅकिंगसारखे प्रश्न. काही लोक गंमतीत विचारतात, “कसं एखाद्याचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करायचं?” पण हे मजेशीर वाटलं तरी सायबर कायद्यानुसार हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकारचे प्रश्न केवळ चुकीचे नसून तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ChatGPT तुमचा चॅट इतिहास रेकॉर्ड करू शकतो आणि गरज पडल्यास ही माहिती तपास यंत्रणांकडे जाऊ शकते.

वैद्यकीय सल्ला

तिसरं म्हणजे वैद्यकीय सल्ला. ChatGPT वर अनेक जण डोकेदुखीपासून ते मधुमेहपर्यंत कोणत्याही आजारासाठी उपचार विचारतात. पण लक्षात ठेवा, हा चॅटबॉट डॉक्टर नाही. तो केवळ माहिती देऊ शकतो, पण प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार निदान किंवा औषधं सुचवणं शक्य नाही. चुकीचा सल्ला घेतल्यास आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मानसिक ताण-तणाव

चौथं आणि मनाला भिडणारं म्हणजे मानसिक ताणाविषयीच्या विचारांची मदत. जर कोणी व्यक्ती मानसिक ताणात असेल, तर ChatGPT त्याला आवश्यक ते भावनिक आधार देऊ शकत नाही. समुपदेशन, संवाद आणि मानवी संवेदना या गोष्टी चॅटबॉटला शक्य नाहीत. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या बाबतीत नेहमी तज्ज्ञांकडूनच मदत घ्या.

धर्म, जात, किंवा सरकारविरुद्ध उत्तेजक प्रश्न

पाचवं आणि अतिशय संवेदनशील म्हणजे धर्म, जात, किंवा सरकारविरुद्ध उत्तेजक प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न ChatGPT ला विचारल्यास ते चुकीची माहिती पसरवण्याचं माध्यम बनू शकते. समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे कायदेशीर गुन्हा होऊ शकतो आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!