गर्मीमुळे त्रस्त आहात?, मग कूलरमध्ये टाका ही 10 रुपयांत मिळणारी वस्तु, मिळेल ACसारखा थंडावा! वीजबिल वाढण्याचंही नो टेंशन

Published on -

सध्या महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरण एकदम दमट झाले आहे.दमटपणामुळे घरात बसणे देखील अवघड झाले आहे. कूलर चालू असला, तरीही वाटतं काहीतरी कमी पडतंय. जणू त्याचा थंडावा हवेत विरून जातोय. एसी लावायचा म्हटलं तर वीज बिलाचं टेन्शन डोकं वर काढतं. अशा वेळी जर एखादी अशी युक्ती मिळाली की जिच्यामुळे तुमचा कूलर एसीसारखा काम करू लागेल आणि तेही अगदी 1 रुपयाच्या खर्चात, तर?

 

याबाबत ऐकून लगेच विश्वास बसत नाही. पण ही गोष्ट आहे अगदी शास्त्रीय आणि खऱ्या अनुभवांवर आधारित. अनेकांनी ही युक्ती वापरून पाहिली आहे आणि त्यांना थंड हवेमध्ये शिमल्याची झलकही जाणवलीय.

कूलरमध्ये टाका मीठ-

तर, नेहमीप्रमाणे तुम्ही कूलरमध्ये बर्फ घालत असालच. पण यावेळी थोडा वेगळा प्रयोग करून पाहा. 2-3 चमचे साधं मीठ त्या बर्फात मिसळा. हेच ते जादूचं घटक , जे तुमच्या कूलरचं रूपांतर थेट एसीमध्ये करतं. हा कुठला मंतर नाही, तर विज्ञानाचं एक सोप्पं तत्त्व आहे फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन. जेव्हा बर्फात मीठ घातलं जातं, तेव्हा बर्फ अधिक लवकर वितळतो आणि आजूबाजूच्या वातावरणातून अधिक उष्णता शोषून घेतं. परिणामी, कूलरमधून बाहेर येणारी हवा अधिक थंड आणि ताजी होते.

ही थंड हवा कूलरच्या पॅडमधून फिरते आणि तुम्हाला मिळत असतो शुद्ध थंडावा, असा की तुम्हाला वाटतं एसी सुरू आहे. विशेषतः कोरड्या हवामानात ही युक्ती आणखी जास्त प्रभावी ठरते, कारण तिथे बाष्पीभवन करणारे कूलर आधीच चांगले काम करत असतात.

काय काळजी घ्याल?

पण या छोट्याशा प्रयोगामागेही थोडं भान ठेवणं गरजेचं आहे. मीठ प्रमाणातच वापरा. जास्त टाकाल तर कूलरच्या आतल्या धातूच्या भागांवर गंज लागू शकतो. म्हणूनच, दर आठवड्याला कूलर नीट स्वच्छ करणं आणि मीठ साचू न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

थोडक्यात काय एक छोटीशी युक्ती तुम्हाला दुप्पट परिणाम देऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर एसी नसेल तरी काळजी करू नका. फक्त थोडं मीठ बर्फात मिसळा आणि मस्त थंड हवेचा अनुभव घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!