आताच्या डिजिटल दुनियेत सुरक्षाबाबत फारच तफावत दिसून येते. प्रत्येक क्लिक, प्रत्येक शेअर, प्रत्येक सेटिंग मागे एखादी गोपनीयता लपलेली असते आणि जर आपण सावध राहिलो नाही, तर याच छोट्याशा दुर्लक्षातून आपल्या खासगी आयुष्यात अंधार पसरू शकतो. सध्या इन्स्टाग्रामवरील एक लपलेली सेटिंग लाखो युजर्ससाठी डोकेदुखी ठरली आहे, कारण तिच्या मदतीने हॅकर्स केवळ तुमचा नव्हे तर तुमच्या मित्रपरिवाराचा मोबाईल डेटा सहजपणे चोरू शकतात.

आज हॅकिंग ही केवळ टेक्निकल बाब राहिलेली नाही. ती आता आपल्या रोजच्या आयुष्याचा एक धोकादायक भाग झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या मोठ्या अॅप्सवर, वापरकर्त्यांनी कोणती माहिती शेअर करावी आणि कोणती नाही हे कधी कधी त्यांनाही ठाऊक नसते. त्यामुळेच या सेटिंगबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे.
इन्स्टाग्रामवरील हॅकिंग
इन्स्टाग्राममध्ये एक अशी सेटिंग आहे जी ‘Upload Contacts’ नावाने ओळखली जाते. ही सेटिंग एकदा ऑन केली की, इन्स्टाग्राम तुमच्या फोनमधील सर्व संपर्क क्रमांक आपोआप त्यांच्या सर्व्हरवर अपलोड करतो. हे ऐकूनच धक्का बसतो ना? पण खरी धक्कादायक गोष्ट तर ती आहे, की जर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट कधी हॅक झालं, तर हॅकर फक्त तुमच्याच नव्हे, तर तुमच्या सर्व मित्रांचे, नातेवाईकांचे आणि सहकाऱ्यांचे मोबाईल नंबरही उघडपणे बघू शकतो.
कारण आपल्याला वाटतं, इन्स्टाग्राम तर फक्त फोटो आणि रील्ससाठी आहे, पण खरं हे आहे की, यामागे प्रचंड माहिती साठवलेली असते, जी चुकीच्या हाती गेल्यास काय होईल, याची कल्पनाही करवत नाही.
‘ही’ सेटिंग लगेच बंद करा
या परिस्थितीत एकच उपाय आहे, जागरूकता. जर तुम्हाला तुमचं आणि तुमच्याच माणसांचं डिजिटल संरक्षण हवं असेल, तर ‘Upload Contacts’ ही सेटिंग त्वरित बंद करणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. इंस्टाग्राम अॅप उघडा, तुमच्या प्रोफाइलवर जा, वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन आडव्या रेषांवर क्लिक करा, नंतर ‘Account Center’ या पर्यायावर जा. इथून ‘Your information and permissions’ निवडा आणि तिथून ‘Upload Contacts’ वर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचं इन्स्टाग्राम आणि लिंक झालेलं फेसबुक अकाउंट दिसेल. ते निवडा आणि ‘Connect Contacts’ चा टॉगल बंद करा.