कोणत्याही माणसाच्या मनात जीवनसाथीबद्दल एक आदर्श कल्पना असते. कुणाला घराला वाहिलेली, प्रेमळ गृहिणी हवी असते, तर कुणाला समविचारी, करिअर करणारी बायको. हे फक्त इच्छेवर नाही, तर आपल्या राशीवरही बरंच काही अवलंबून असतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ग्रहांची स्थिती, सातवं घर आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या जोडीदाराच्या स्वभावावर आणि तिच्या आयुष्याच्या वाटचालीवर होतो.
मेष राशी

मेष राशीचे लोक नेहमीच धडाडीचे, महत्वाकांक्षी आणि नेतृत्वगुण असलेले असतात. त्यामुळे त्यांना आपल्यासारखीच धावपळ करणारी, स्वतंत्र विचारांची पत्नी मिळण्याची शक्यता असते. तिचं करिअर हे व्यवसाय, सर्जनशील क्षेत्र किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी जोडलेलं असतं. मेष व्यक्तींना आपल्या जोडीदारात आत्मविश्वास आणि ऊर्जा हवी असते, म्हणून त्यांचं लग्न सहसा नोकरी करणाऱ्या महिलेशी होतं.
वृषभ राशी
वृषभ राशीचे लोक स्थैर्यप्रिय, घरकुलाला महत्त्व देणारे असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारी स्त्री सहसा घराला प्राधान्य देणारी, कुटुंबकेंद्रित असते. जर ती नोकरी करत असेल, तरी तिची निवड अध्यापन किंवा बँकिंगसारख्या शांत व स्थिर नोकऱ्यांतून होते. वृषभ लोकांना आयुष्यात एक स्थिर, प्रेमळ आणि आरामदायी सहचार हवा असतो.
मिथुन राशी
मिथुन राशीचे लोक बोलके, हुशार आणि सामाजिक असतात. त्यांच्या पत्नी बहुतेक वेळा संवाद-केंद्रित नोकऱ्या करणाऱ्या जसं की पत्रकारिता, विपणन किंवा शिक्षण क्षेत्रात असतात. मिथुन लोकांना विचारांची देवाणघेवाण करणारी, बौद्धिक समतोल असलेली जोडीदार हवी असते.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांची जडणघडणच घरावर प्रेम करणाऱ्या स्वभावाने झालेली असते. त्यांना पत्नी म्हणून ज्या स्त्रिया मिळतात त्या बहुतेक वेळा गृहिणीच असतात. काही वेळा त्या वैद्यकीय, सामाजिक कार्य किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असू शकतात. पण त्यांच्या आयुष्यात घर आणि भावना यांना प्राधान्य दिलं जातं.
सिंह राशी
सिंह राशीचे लोक थेट, आत्मविश्वासू आणि प्रभावी असतात. त्यांच्या जोडीदारांकडूनही ते चमक अपेक्षित करतात. त्यामुळे त्यांना फॅशन, मीडिया किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लॅमरस आणि करिअर-केंद्रित स्त्रिया पत्नी म्हणून मिळतात. त्यांच्या नात्यात दोघेही एकमेकांच्या कर्तृत्वाचा आदर करत पुढे जातात.
कन्या राशी
कन्या राशीचे लोक तपशीलांवर लक्ष देणारे आणि संयमी असतात. त्यामुळे त्यांची पत्नी संगठित, जबाबदार आणि कधी गृहिणी, तर कधी आरोग्यसेवा, शिक्षण किंवा लेखा विभागात काम करणारी असते. कन्या राशीच्या जोडप्यांमध्ये घर आणि करिअर या दोघांमध्ये संतुलन असतो.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांना सौंदर्य, रोमान्स आणि बौद्धिक संवाद प्रिय असतो. त्यांना पत्नी म्हणून कला, डिझाइन, कायदा किंवा फॅशन क्षेत्रात काम करणाऱ्या सृजनशील स्त्रिया मिळतात. त्यांच्या नात्यात एक प्रकारची सौंदर्य आणि समाजात आदर असलेली प्रतिष्ठा असते.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचे लोक गूढ, उत्साही आणि निष्ठावान असतात. त्यांची पत्नी बहुतेक वेळा कुटुंबासाठी समर्पित गृहिणी असते. पण काही वेळा ती संशोधन, औषध किंवा गुप्तहेर क्षेत्रात काम करणारी असते. भावनिक खोली आणि निष्ठा हे त्यांच्या नात्याचे केंद्र असतं.
मकर राशी
मकर राशीचे लोक कष्टाळू, शिस्तप्रिय आणि व्यावहारिक असतात. त्यांना गृहिणी मिळण्याची शक्यता जास्त असते. पण अशा गृहिणी, ज्या जबाबदारीनं घर सांभाळतात आणि आर्थिक शिस्त राखतात. काही वेळा त्या व्यवस्थापन, बँकिंग किंवा प्रशासकीय क्षेत्रातही कार्यरत असतात.
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोक सर्जनशील आणि समाजहिताची कामं करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या पत्नीही स्वतंत्र विचाराच्या, स्वयंसेवी संस्था, तंत्रज्ञान किंवा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या असतात. त्या कुटुंबात असल्या तरी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखतात.
मीन राशी
मीन राशीचे लोक अत्यंत भावनिक, दयाळू आणि कलात्मक असतात. त्यामुळे त्यांना कुटुंब आणि मुलांवर प्रेम करणारी, समर्पित गृहिणी मिळते. काही वेळा ती संगीत, चित्रकला किंवा समाजसेवा या क्षेत्रांतही कार्यरत असते. त्यांच्या नात्यात भावना आणि कुटुंबप्रेम हा गाभा असतो.