अर्जुनाचं ‘गांडिव’ आता हवाई लढाईत! चीनच्या PL-15 पेक्षा प्रगत क्षेपणास्त्र भारताकडे, मॅक 4.5 वेगाने करणार हल्ला

Published on -

भारतीय लष्कराच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले आहे. आता आपल्याकडे एक असं शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूचं विमान त्याने हल्ला करण्यापूर्वीच नष्ट करू शकतं. ‘गांडिव’ नावाच्या या आधुनिक हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने चीनसारख्या शत्रूंना कडक संदेश दिला आहे. महाभारतात अर्जुनाच्या ‘गांडिव’ धनुष्याने जसा संहार केला, तसाच आधुनिक युगात हे क्षेपणास्त्रही आकाशात शत्रूंचा विनाश घडवेल.

‘गांडिव’

1990 च्या दशकात डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एक स्वप्न पाहिलं होतं. स्वदेशी BVR (Beyond Visual Range) क्षेपणास्त्र तयार करण्याचं. आरंभ हा छोट्या प्रकल्पाने झाला, पण आता तो ‘गांडिव’ या नावाने देशाच्या अभिमानाचा विषय बनला आहे. Astra Mk-3, ज्याला ‘Gandiva’ असं नाव देण्यात आलं आहे, हे भारताचं सर्वात आधुनिक आणि ताकदवान हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ठरलं आहे.

भारतीय हवाई दल आजवर फ्रान्सच्या Meteor, रशियाच्या R-77, आणि इस्रायलच्या Python यांसारख्या आयातीत क्षेपणास्त्रांवर अवलंबून होतं. युद्धाच्या वेळी जर ही शस्त्रसाठ्याची साखळी तुटली, तर भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकली असती. हे लक्षात घेऊनच ‘अस्त्र’ प्रकल्पाला चालना मिळाली आणि त्यातून Mk-1, Mk-2 आणि आता Mk-3 ‘गांडिव’ आकारास आलं.

गांडिव Astra Mk-3 चं सामर्थ्य

गांडिव म्हणजे Astra Mk-3 हे SFDR (Solid Fuel Ducted Ramjet) तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्र आहे, जे 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शत्रूवर मारा करू शकतं. याचा वेग मॅक 4.5 इतका आहे, म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा 4.5 पट अधिक. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या ‘J-20’ स्टेल्थ फायटर जेटसारख्या प्रगत विमानांनाही हल्ला करण्याआधीच नष्ट करू शकतं.

Astra Mk-1 आधीच हवाई दलात समाविष्ट झालं असून, ते 100 किमी अंतरावर लक्ष्यभेदन करू शकतं. Mk-2 मध्ये ही क्षमता वाढून 145 किमी झाली आहे. दोन्ही क्षेपणास्त्रं तेजस आणि Su-30MKI सारख्या लढाऊ विमानांवरून डागता येतात. या क्षेपणास्त्रांमुळे भारताची हवाई ताकद केवळ अधिक सक्षमच नाही, तर अधिक स्वयंपूर्णही झाली आहे.

Mk-1 चं उत्पादन सुरू

Mk-1 चं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे, आणि त्यासाठी ₹2,971 कोटींचा करार भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत करण्यात आला आहे. Mk-3 हे Gandiva मात्र त्याच्या अत्याधुनिक डिझाइनमुळे भारतीय लष्कराच्या हवाई रणनीतीत ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!